BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

परदेशातून जिल्ह्यात येणारे प्रवासी 14 दिवसांसाठी होणार इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन -जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी


परदेशातून जिल्ह्यात येणारे प्रवासी 14 दिवसांसाठी होणार इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन -जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी


सांगली दि. 9(जि.मा.का.)
सांगली जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी प्रशासनाने स्थळ निश्चित केले असून या ठिकाणी सदर प्रवासी स्वखर्चाने क्वारंटाईन करण्यात येतील. यासाठी अशा प्रवाशांनी उपविभागीय अधिकारी मिरज व पोलीस प्रशासन यांच्याशी स्वतःहून संपर्क साधावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर केला आहे‌ . यामुळे परदेशात अडकलेले विविध कामानिमित्त गेलेले नागरिक, परदेशात नोकरी करणारे भारतीय नागरिक, विद्यार्थी यांना त्यांचा तेथील रहिवास लांबल्याने अनेक जण भारतात येण्यासाठी प्रयत्नशील होते. अशांना भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांनी आरोग्याचे सर्व प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळणे अनिवार्य असून यामध्ये मास्क वापरणे, पर्यावरणीय स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, हातांची स्वच्छता आदींचा समावेश आहे . विमानतळावर उतरल्यानंतर सर्वांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार असून यात  ज्यांना कोरोणा
सदृश्य लक्षणे आढळतील त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारखाली ठेवण्यात येईल. तर उर्वरित प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात 14 दिवस इन्स्टिट्यूशनल करण्यात येईल.14 दिवसांनंतर कोरोनाची चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना स्वतःच्या घरी पाठविण्यात येईल असे करताना त्यांनी पुढील 14 दिवस स्वतःच्या आरोग्याची स्वतः निरीक्षणाची हमी देणे आवश्यक आहे. असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत .

त्यानुसार सांगली जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यासाठी स्थळनिश्चिती केली असून या ठिकाणी सदर प्रवासी स्वखर्चाने इंस्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली असून जे विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण न करता स्वतःच्या थेट घरी जातील अशा विद्यार्थ्यांची माहिती स्थानिक लोकांनी तात्काळ प्रशासनास द्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments