BREKING NEWS -----स्कार्पीओ दरीत कोसळून पाच जखमी -----शित्तूर -आरळा पूल पाण्याखाली --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident

अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident

अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident 

अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident 

शिराळा,ता.२८:बिऊर (ता.शिराळा) येथील शांतीनगर बस स्थानकानजीक शिराळा-कोकरूड मुख्यरस्त्यावर मोटारसायकल व चारचाकी गाडीची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मुलगी तृप्ती आत्माराम पवार ( वय (२८),  व वडील आत्माराम विष्णू पवार (वय६०)  रा. तानाजी चौक इस्लामपूर या  बाप लेकीचा   मृत्यू झाला. 

अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident 

ही घटना  आज रविवार ‍‍‍‌(ता.२८) रोजी दुपारी चार वाजण्याच्या  सुमारास घडली.  याबाबत  धैर्यशील पाटील यांनी शिराळा पोलीसात  वर्दी दिली आहे. याबाबत घटनास्थळावरून तसेच पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की,   चार चाकी गाडीतून  डॉ. अल्पेश शिवाजी खडतरे ( वय ३८ रा. सोलापूर) हे आपल्या कुटुंबियांसह रत्नागिरीहुन सोलापूरकडे चालले होते. तर मोटारसायकल वरून आत्माराम पवार हे मुलगी तृप्ती सह  इस्लामपूरहुन कोकरूडकडे कामानिमित्त निघाले होते.

अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident 

 दरम्यान बिऊर शांतीनगर बस स्थानकापासून काही अंतरावर मोटरसायकल व चारचाकीची समोरासमोर धडक झाली.  अपघात इतका भिषण होता की मोटारसायकल वरील तृप्ती या गाडीवरून  उंच उडून खाली  पडल्या तर आत्माराम  हे चारचाकी गाडीच्या समोरील काचेवर  आदळले. यामध्ये डोक्यास गंभीर मार लागल्याने तृप्ती हिचा जागीच  मृत्यू झाला. आत्माराम हे  गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेले असता  त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.  या अपघातात मोटरसायकलचा चक्काचूर  झाला असून चार चाकीचे पुढील बाजूने मोठे नुकसान झाले आहे.अपघाताच्या  या आवाजाने शेतातील लोक जमा झाले.

अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident

   या अपघाताची माहिती  समजताच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांच्यासह नातेवाईकांनी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात तातडीने धाव घेतली. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात तृप्तीचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.आत्माराम हे  शेतकरी होते. त्यांच्या पश्चात, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. पुढील  तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर हे करीत आहेत.

अपघातात बाप लेकीचा मृत्यू |Father and daughter died in an accident 

Post a Comment

0 Comments