शिराळा :केंद्र शासनाचे साखरेची कमीत कमी विक्री किंमत ४ हजार ३०० रुपये क्विंटल करणे गरजेची आहे, तरच साखर कारखानदारी टिकेल, असे प्रतिपादन ‘विश्वास’चे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले. या वर्षी सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे, असेही ते म्हणाले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिराळा येथील महायोगी गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज होते.
अध्यक्ष श्री. मानसिंगभाऊ म्हणाले, केंद्र शासनाने सातत्याने उसाच्या किमान खरेदी दरात सतत वाढ केली आहे. त्या तुलनेत साखरेची किमान विक्री किंमत वाढ केलेली नाही. त्यामुळे उसाची किमान खरेदी किंमत, तोडणी व वाहतूक, साखर तयार करण्याचा प्रक्रिया खर्च पाहता साखरेचा विक्री दराचा मेळ बसत नाही. त्यासाठी साखरेचा किमान विक्रीचा दर चार हजार तीनशे रुपये करणे गरजेचे आहे, तरच साखर कारखानदारी टिकणार आहे.
ते म्हणाले, पावसाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांसह साखर व्यवसायाला गेल्या दोन, तीन वर्षात मोठा फटका बसत आला आहे. उसाचे एकरी उत्पादन घटले आहे. कार्यक्षेत्रात असणाऱ्या प्रमुख वारणा, मोरणा व कडवी नदीकाठच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सर्व पिकांचे नुकसान होत आले आहे. या वर्षी तर ८ मे पासून पावसाळ्यास सुरवात झाली असून आज अखेर पावसाची हजेरी सुरूच आहे. ऊस पिकाला साखर उतारा मिळण्यासाठी थंडी (हिवाळा) आवश्यक असतो. मात्र आजअखेर हिवाळ्याचा मागमूस नाही. ‘विश्वास’ची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने आम्ही शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून उसाची आधारभूत किमतीपेक्षा (एफ. आर. पी) जास्तीचा म्हणजेच 3 हजार २७५ रुपये दर दिला आहे. या गळीत हंगामात सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे. नोंदीप्रमाणे तोडी देण्यात येतील. शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादकांनी पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पीर पारसनाथ यांच्या हस्ते विधिवत वजन काटा पूजन करण्यात आले. त्यांच्यासह अध्यक्ष, संचालकांच्या उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ केला. यावेळी संचालक सर्वश्री. विराज नाईक, दिनकरराव पाटील, हंबीरराव पाटील, सुरेश चव्हाण, बाबासो पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील, सुरेश पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव आमरे, सुहास घोडे-पाटील, संदीप तडाखे, सुकुमार पाटील, तुकाराम पाटील, आनंदराव पाटील, यशवंत दळवी यांचेसह कोंडिबा चौगुले, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख, खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील यांनी आभार मानले.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments