शिराळा:११ नोव्हेंबर २०२५ :राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख मंडळी, कार्यकर्त्यांनी एकसंध व जिद्दीने काम करून विरोधकांना शिराळा नगरपंचायतीमधील एकही जागा जिंकता येणार नाही असा बंदोबस्त करावा, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिराळा नगरपंचायतीसह पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत एकत्र लढवतील, हे स्पष्ट करत उलट सुलट चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.
चिखली (ता. शिराळा) येथे आज भाजपला मास्टर स्टोक देत मानसिंगभाऊंनी माजी नगरसेवक अभिजित नाईक, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती सदस्य सौ. वैशाली नाईक, विक्रमसिंह नाईक, सौ. गायत्री नाईक यांची पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करवून घरवापसी घडवून आणली. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
श्री. मानसिंगभाऊ म्हणाले, शिराळ्यात विरोधकांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. सर्व कार्यकर्त्यांनी वैयक्तिक हेवे दावे बाजूला ठेवून हातात हात घालून काम केल्यास विरोधकांना एकही जागा जिंकता येणार नाही. शिवाय विधानसभा निवडणुकीत घटलेल्या मतदानाचा वचपा काढता येईल. विरोधकांना आतापर्यंत शिराळ्याच्या विकासाविषयी जनतेची दिशाभूल केली आहे. तोरण ओढा सुशोभीकरण, किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम यासह अनेक कामांना खोडा घालण्याचे काम केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामे आणून ते मी शिराळ्यासाठी काहीतरी करीत असल्याचे भासवत आहेत. मी प्रत्यक्षात शिराळ्यात कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण केली आहेत. शहरात अनेक सोई-सुविधा निर्माण केल्या आहेत. म्हणून गेली कित्येक वर्षे शिराळकरांनी मला प्रेम दिले आहे. मी कधीही मते मिळविण्यासाठी प्रेम करत नाही.
ते म्हणाले, मी लोकप्रतिनिधी असताना शैक्षणिक प्रबोधन करणे या मुद्द्याखाली शिराळा नागपंचमीतील प्रत्येक मंडळातील चार कार्यकर्त्यांना नाग हाताळण्याची परवानगी आणली होती. मात्र त्यावेळी काही मंडळी व विरोधकांनी हे मान्य केले नाही. अशी प्रथा पाडल्यास तीच कायम होईल, म्हणून त्यांनी विरोध केला. आता त्याच मुद्द्याखाली मोजक्या लोकांना परवानगी मिळवून नागपंचमी उत्सवाचा राजकीय वापर केला जात आहे. आमच्यापासून काही काळ बाजूला गेलेले अभिजित, वैशाली, विक्रम व गायत्री यांनी मूळ कुटुंबात व प्रवाहात आजपासून पुन्हा सहभागी झाले आहेत. त्यांच्या निर्णयामुळे निश्चितच मोठा परिणाम होणार आहे. यांच्यासह सर्व स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांनी एक मनाशी खूणगाठ बांधावी की, कोणत्याही आमिषाला बळी न पडता नगरपंचायतीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, यासाठी एकसंध प्रयत्न करावेत.
युवा नेते विराज नाईक म्हणाले, नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी मानसिंगभाऊंचा शब्द प्रमाण मानून काम करावे. प्रत्येक प्रभागात मोठे जनमत बाजूने असणारा उमेदवार दिला जाईल. आजच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली असून कार्यकर्त्यांत उत्साह आला आहे. कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना एकही जागा मिळणार नाही, याची काळजी घेऊन जोमाने काम करायचे आहे, याची खूणगाठ मनाशी बांधावी. ज्या त्या कार्यकर्त्यांनी आपला प्रभाग सोडून इतर ठिकाणी लक्ष न देता दिलेल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान कसे मिळवता येईल, हे पहावे. होऊ घातलेली नगरपंचायत व आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकीत आपला विजय निश्चित आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक युवकचे शहर अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केले. श्री. अभिजित नाईक, श्री. विक्रमसिंह नाईक, सौ. वैशाली नाईक व सौ. गायत्री नाईक यांचा प्रवेशाबद्दल तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक व विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी विश्वासचे संचालक विश्वास कदम, माजी सरपंच प्रमोद नाईक, विवेक नाईक, दूध संघाचे संचालक भूषण नाईक, माजी सरपंच देवेंद्र पाटील, अजय जाधव, माजी जि. प. सदस्य प्रवीण शेटे व महादेव कदम, राष्ट्रवादी शिराळा शहर अध्यक्ष सुनील कवठेकर यांच्यासह शिराळा शहरातील अनेक मान्यवर, आजी, माजी पदाधिकारी, व्यापारी, युवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार.
श्री. मानसिंगराव नाईक यांनी त्यांच्या भाषणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व आम्ही एकत्र नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे गेल्या नगरपंचायत निवडणुकीत या युतीचा विजय झाला होता. त्याच्या पुनरावृत्तीची चर्चा होती.
महाराष्ट्रातील पहिली घटना : छ. संभाजी महाराज स्मारकाचा निधी थेट अर्थ व नियोजनमधून
शिराळ्यातील छ. संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी मदत केली आहे. त्यांनीच १३.५० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली. हे करत असताना कोणताही अडथळा यायला नको म्हणून त्यांनी याचा निधीची तरतूद थेट अर्थ व नियोजन विभागाकडून केली. अशा प्रकारे निधी देण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे, असे मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments