शिराळा : भटवाडी (ता.शिराळा) येथील सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख (वय ६८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,मुलगी,सुना,जावई नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवारी २६ रोजी भटवाडी येथे सकाळी ९.३० वा. आहे.
देशमुख यांनी मंत्रालय मुंबई येथून आपल्या प्रशासकीय सेवेस सुरुवात केली होती. फलटण, सातारा आणि नागपूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. प्रशासकीय सेवेच्या कार्यकाळात पत्रकारांचे अभ्यास दौरे, कृषी क्षेत्र, कृष्णा खोरे, धरणे अभ्यास तसेच विशेषतः कोयना धरण लेक टॅपिंग यांसारख्या दुर्मिळ आणि तितक्याच घटनांचे साक्षीदार होण्याची संधी त्यांना मिळाली होती.सामाजिक,राजकीय आणि शासकीय सेवेतील वरिष्ठांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.मुंबई,पुणे,नागपूर,सातारा आणि सांगली येथील पत्रकारांच्या प्रश्नावर ते सातत्याने आवाज उठवून पाठिंबा देत असत.विविध चॅनेल,आकाशवाणी,मुलाखती,दैनिकांमधून लिखाणाद्वारे त्यांनी प्रबोधनाचे कार्य केले आहे.अनेक बेरोजगार युवकांना शासकीय व खाजगी नोकरी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.त्यांनी शिराळा तालुका जागृत ग्राहकराजा संघटनेचे अध्यक्ष व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेचे सल्लागार म्हणून काम पहिले आहे.त्यांनी अनेक पत्रकारांना अधिस्विकृतीधारक पत्रकार होण्यासाठी मोलाचे सहकार्य व मदत केली आहे.त्यांच्या या अचानक जाण्यामुळे शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेचा एक तारा निखळून पडला असून या संघटनेची कधी ही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.या दुख:तून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो ......
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments