शिराळा, ता. १०:बिऊर (शांतीनगर), ता.शिराळा येथे शेतात झाडाच्या फांद्या तोडत असताना फांदी ३३ के.व्ही.च्या विद्युत तारेवर पडल्याने विजेचा जोरदार धक्का बसून पांडुरंग रंगराव शिंदे (वय ४६, रा.शिराळा,मोरणा धरण रोड,) यांचा जागीच मृत्यू झाला.ही दुर्दैवी घटना आज शनिवारी (ता. १०) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संभाजी रंगराव शिंदे (वय ३५) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिराळा पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,पांडुरंग शिंदे हे आज सकाळी बिऊर (शांतीनगर) येथील खोपीचे टेक हद्दीत वसंतराव जयसिंग पाटील यांच्या शेतात झाडाच्या फांद्या तोडत होते.यावेळी सुमारे १२ फूट लांबीच्या फांदीचा शेंडा जवळून गेलेल्या ३३ के.व्ही. विद्युत तारेवर पडला, तर फांदीचा मागील भाग झाडावर अडकला.विद्युत लाईन सुरू असल्याने विद्युत प्रवाह झाडात उतरला आणि झाडावर असलेल्या पांडुरंग शिंदे यांना जोरदार विजेचा धक्का बसला.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.यावेळी शिंदे यांच्या नातेवाईक व मित्र परिवार यांनी पांडुरंग यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण होते.मात्र मदतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने सायंकाळी पाच वाजता मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई-वडील,भाऊ व भावजय असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच विद्युत वितरण कंपनी शिराळाचे शाखा अभियंता संदीप देशमुख व कोकरूडचे शाखा अभियंता सुधीर देशमाने यांनी घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.सोमवारी (ता.१२) मिरज येथील विद्युत निरीक्षक घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बाजीराव भोसले करीत आहेत.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments