शिराळा,ता.९:शिराळा नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी आपल्या निवासस्थानापासून नगरपंचायत कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढून अधिकृतपणे शिराळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
सकाळी १०वाजता त्यांच्या निवासस्थानातून पदयात्रेला सुरुवात झाली.यावेळी समर्थक,कार्यकर्ते,विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हलगी व धनगरी ढोल-ताशांच्या या पारंपारिक वाद्याच्या गजरात, नाईक यांचे स्वागत करण्यात आले. पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत नगरपंचायत कार्यालयात दाखल झाली.त्या नंतर पृथ्वीसिंग नाईक यांनी गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज,खासदार धैर्यशील माने,आमदार सत्यजित देशमुख,माजी सभापती ॲड.भगतसिंग नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रथमच उतरून नगरपंचायतसाठी निवडणूक लढवून पृथ्वीसिंग नाईक यांनी नगराध्यक्षपदावर आपली मोहर उमटवली.त्यामुळे त्यांच्या माध्यमातून माजी आमदार स्व.वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.त्यांना लहानपणापासूनच संघटनकौशल्याची विशेष आवड होती. बालवयात त्यांनी‘ईगल ग्रुप गणेश मंडळ’ची स्थापना करून मित्रमंडळींसह परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले.लोक वर्गणी संकलन,कार्यक्रम नियोजन आणि लोकसहभाग यामधूनच त्यांचे नेतृत्वगुण विकसित झाले.पुढे शाळा व महाविद्यालयीन जीवनात तालुकाभर युवकांचे संघटन उभे करत त्यांनी युवा वर्गात वेगळे स्थान निर्माण केले.त्यांचे आजोबा स्व. वसंतराव नाईक हे सन १९६२ ते १९७२ या दहा वर्षांच्या कालावधीत शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांचे वडील ॲड.भगतसिंग नाईक यांनी पाच वर्षे शिराळा पंचायत समितीचे सभापती म्हणून कार्यभार सांभाळला.अशा राजकीय वारशातूनच पृथ्वीसिंग नाईक यांची वाटचाल सुरू झाली.त्यांनी बी.एस्सी.शिक्षण घेतलेले असून सध्या ते प.पू. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, उत्सव,सुख-दुःखाचे प्रसंग तसेच लोकांच्या अडीअडचणींमध्ये स्वखर्चाने मदत करण्याची त्यांची भूमिका नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली.आपल्याच घराण्यातून राजकारणात काही बाबतीत अन्याय होत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आपला राजकीय मार्ग बदलत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.त्यांच्या कार्याची दखल घेत शिंदे यांनी त्यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली.पहिल्याच निवडणुकीत यश मिळवत पृथ्वीसिंग नाईक यांनी शिराळा नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष म्हणून मोहर उमटवली.
यावेळी उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे,नगरसेवक रमेश कांबळे,सचिन डांगे,राजसिंह पाटील,अवधूत गायकवाड,नगरसेविका,मनस्वी निकम,प्राजक्ता कुलकर्णी,सुनिता पाटील यांच्यासह विश्वास कदम,विश्वप्रतापसिंह नाईक,के.डी.पाटील,सुखदेव पाटील,उत्तम निकम,महेश पाटील,दीपक गायकवाड,विद्याधर कुलकर्णी, कुलदीप निकम, संतोष इंगवले, सागर नलवडे,विक्रम पाटील,नम्रता नाईक,कश्मिरा नाईक,दुर्गा नाईक-पाटील,पूनम इंगवले,अनिता धस,संगीता साळुंखे उपस्थित होत्या.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments