शिराळा,ता.९:शिराळा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे बसवेश्वर शेटे यांची बिनविरोध निवड झाली.तसेच स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे अभिजित प्रतापराव यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश खंडागळे-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.पीठासन अधिकारी नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ह्या निवडी पार पडल्या.
उपनगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या बसवेश्वर शेटे,स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपचे अभिजित यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश खंडागळे-पाटील यांचा प्रत्येकी एक एक अर्ज असल्याने ह्या निवडी बिनविरोध झाल्या.निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे तसेच स्वीकृत नगरसेवकांचा नगरपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे,विकासकामांना प्राधान्य देणे आणि पारदर्शक कारभार राबवणे,असा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक हे निवडून आले आहेत.भाजप व शिवसेना शिंदे गट यांना ११ तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ६ जागा मिळाल्या आहेत.आज सकाळी १० ते १२ उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्याकडे नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते.पहिली बैठक दुपारी १२ वाजता झाली.पीठासन अधिकारी नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ ते १२.३०वाजता छाननी,दुपारी १२:३० ते १२:४५ अर्ज माघारीची मुदत होती.
उपनगराध्यक्ष पदासाठी बसवेश्वर शेटे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
या बैठकीच्या चौवीस तास अगोदर स्वीकृत नगरसेवक नामनिर्देशन जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे सादर करण्यात आले होते.आज दुपारी १:१५ वाजता नगराध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या यामध्ये स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे अभिजित यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश खंडागळे-पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळी नगरसेवक केदार नलवडे,रमेश कांबळे,सचिन डांगे,राजसिंह पाटील,अवधूत गायकवाड,रामचंद्र जाधव,अभिजित यादव,नगरसेविका सीमा कदम,अर्चना कदम,लक्ष्मी कदम,सविता कांबळे,मनस्वी निकम,प्राजक्ता कुलकर्णी,सुनिता पाटील,शिवानी नलवडे,माधुरी गायकवाड यांच्यासह मुख्याधिकारी सुरज कांबळे, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments