शिराळा,ता.२०:शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रभाग ४ साठी अत्यंत चुरशीने ८६.३६टक्के अत्यंत शांततेत मतदान झाले.५५० मतदार पैकी ४७५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.त्यामध्ये २७९ पैकी २३५ महिला तर २७१ पैकी २४० पुरुष मतदार यांचा समावेश आहे.
सकाळच्या सत्रात थंडीमुळे मतदानाचा वेग संथ गतीने होता.दहा नंतर वाढत्या उन्हा बरोबर तो हळूहळू वाढला.साडे तीन नंतर मात्र मतदान केंद्रावर गर्दी जाणवू लागली.मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,विजेची सोय,मतदारांसाठी रांग नियंत्रण,दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.यासाठी क्षेत्रीय अधिकारी १,केंद्राध्यक्ष१,मतदान केंद्र अधिकारी२,शिपाई,पोलीस,होमगार्ड प्रत्येकी१ व राखीव कर्मचारी ६अशा १३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले होते.मतदान केंद्राला निवडणूक निरीक्षक किरण कुलकर्णी,पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील,निवडणूक निर्णय अधिकारी शामला खोत-पाटील,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरज कांबळे,पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांनी भेट देवून पाहणी केली.मतदान केंद्राला भगतसिंग नाईक,रणजितसिंह नाईक,रणधीर नाईक,विराज नाईक यांनी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.आमदार सत्यजित देशमुख,माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक,माजी आमदार मानसिंगराव नाईक,भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी भ्रमणध्वनीवरून मतदानाचा आढावा घेतला.
सदस्यपदासाठी ६.५४ टक्के जास्त मतदान
२डिसेंबरला १७ पैकी १६ प्रभाग व नगराध्यक्षपदासाठी ८३.०८ टक्के मतदान झाले होते.या प्रभागात २ डिसेंबरला फक्त नगराध्यक्षपदासाठी ७९.८२ मतदान झाले होते.आज (ता.२०)सदस्य पदासाठी ८६.३६ टक्के मतदान झाले.त्यामुळे नगराध्यक्षपदा पेक्षा सदस्यपदासाठी ६.५४ टक्के मतदान झाले.
मतदानासाठी महिला पुरुषांच्यात चुरस
या प्रभागात सुरुवात व शेवटच्या दोन तासात पुरुषांचे तर मध्यंतरीच्या चार तसात महिलांचे मतदान जास्त झाले.त्यामुळे पुरुष व महिला मतदानात चढ उतार जाणवत होता.
२ डिसेंबर ला झालेल्या एकूण १६ प्रभाग व आज च्या प्रभाग ४ चे एकूण मतदान,झालेले मतदान व कंसात टक्केवारी अशी-
१(६१६)-५५५(९०.१०),
२(७७७)-६७९(८७.३९),
३(९८५)-७९१(८०.३०),
४(५५०)-४३९(७९.८२)फक्त नगराध्यक्षपदासाठी,
४(५५०)४७५(८६.३६)फक्त सदस्यपदासाठी.
५(९९१)-८४२(८४.९६),
६(८८३)-७२७ (८२.३३),
७(७३४)-६३३(८६.२४),
८(६८२)-६१३(८९.८८),
९(७२२)-५९२(८१.९९),
१०(९६६)-७१८(७४.३३).
११(६२१)-४७८(७६.९७),
१२(६९४)-५७८(८३.२९),
१३(६१८)-५०६(८१.८८),
१४(९४८)-७८७(८३.०२),
१५(८३५)-७०१(८३.९५),
१६(७३८)-६०१(८१.४४).
१७(७३५)-६३९(८६.९४)

0 Comments