शिराळा, ता. ३० : बिऊर (ता. शिराळा) येथील अमृतनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील (वय ६) या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला अनेक वेळा फोन लावला तरीही कुणीही फोन उचलला नाही. त्यामुळे संतप्त जमावाने वन विभागाचे कार्यालय फोडून 'बिबट्यांना मारायची परवानगी द्या. आम्हाला पैसे नकोत मुलगा परत द्या', अशी मागणी केली.उपजिल्हा रुग्णालयात राजवीरच्या आईचा असणारा आक्रोश हा हृदय हेलावणार होता. वन विभागाचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नगरिकांनी नकार दिला होता. अखेर अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी समजूत काढल्याने रात्री पावणे बारानंतर शवविच्छेदनास परवानगी देण्यात आली. त्यानंतर रात्री १२ वाजता जमाव पांगल्याने संतप्त वातावरण शांत झाले..
यावेळी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राजवीर व त्याची लहान बहीण कार्तिकी (वय ४) आपल्या घरातून खेळत खेळत शेजारच्या घरात जात असताना अचानक बिबट्याने राजवीरवर हल्ला केला. त्यावेळी सोबत असणारी बहीण ओरडल्याने घरातील लोक व नागरिक जमा झाले. तोपर्यंत बिबट्याने राजवीरच्या गळ्याला पकडून सुमारे पाचशे फुटांपर्यंत फरफटत शंकर केरू पाटील यांच्या शेतापर्यंत नेले. त्यावेळी पंडित पाटील, बजरंग पाटील, शशिकांत पाटील, कृष्णात पाटील, महादेव भीमराव पाटील, पोपट पाटील, राजू पाटील, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, अक्षय पाटील यांच्यासह चाळीसहून अधिक नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग केला.ओढ्यालगत राजवीरचे चुलत आजोबा शंकर श्रीपती पाटील यांनी बॅटरीच्या झोतात राजवीरला बिबट्याने तोंडात पकडलेले पाहिले. प्रकाशझोत तोंडावर पडताच बिबट्याने राजवीरला सोडून धूम ठोकली. त्यानंतर शंकर पाटील व इतरांनी जखमी राजवीरला शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. राजवीर मृत झाल्याने शिराळा व बिऊर येथील जमाव संतप्त झाला होता. वनविभागाचे कर्मचारी फोन उचलत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थ वन विभागाचे भुईकोट किल्ला परिसरातील कार्यालयाकडे आले. जमावाने कार्यालयाचे दार, खिडक्या फोडल्या, तसेच लोखंडी गेटही उपसून फेकून दिले. जमाव संतप्त झल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.वन विभागाच्या कर्मचार्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. वन विभागाचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नगरिकांनी नकार दिला होता. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर नाईक, रेणुकादेवी देशमुख, सम्राट नाईक, विराज नाईक, सत्यजित नाईक, तहसीलदार श्यामला खोत-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील, पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, साईतेजस्वी देशमुख, सुखदेव पाटील, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, भूषण नाईक, विश्वास कदम उपस्थित होते. पोलिस बंदोबस्त वाढवला संतप्त जमावाने वन कार्यालय फोडल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, उपवनसंरक्षण सागर गवते, प्रांतधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी रात्री ११ वाजता उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत आमदार सत्यजित देशमुख, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मनसिंगराव नाईक, तहसीलदार शामला खोत रुग्णालयात बसून होते. पोलिस यंत्रणा प्रयत्न करीत होती. मात्र संतप्त जमाव शांत होत नव्हता. अखेर अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी समजूत काढल्याने रात्री पावणे बारानंतर शवविच्छेदनास परवानगी देण्यात आली.त्यानंतर रात्री १२ वाजता जमाव पांगला.
वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्यासह शिराळा कार्यालयातील सर्व वन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव नागपूरला पाठवला आहे. त्याला सोमवारपर्यंत मंजुरी मिळेल,असे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सर्व प्रक्षोभक ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजवीरच्या शव विच्छेदनासाठी अनुमती दिली. जमाव शांत झाला
राजवीरला बिबट्या घेऊन शेतात गेल्याने
लोक शेतात शोधण्यासाठी शेतात गेले. पाणी पाजलेल्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसल्याने त्याच्या मागावर जाऊन बिबट्याचा शोध घेतल्याने राजवीर सापडला. हल्ला केलेला बिबट्या चौथ्यांदा सव्वानऊच्या दरम्यान याच परिसरात आल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
रात्री वडिलांवर पुन्हा हल्ला
दरम्यान, रात्री ११.४५ च्या सुमारास बिबट्या पुन्हा त्याच ठिकाणी परतला. त्याने तेथे थांबलेले राजवीरचे वडील हनमंत पाटील यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने तो पळून गेला.
झालेला प्रकार दुर्दैवी आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. याप्रकरणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी बोलणे झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बदली अथवा निलंबनासाठी मी प्रयत्न करीन. ग्रामस्थांनी कायदा हातात घेऊ नये. एकोप्याने मार्ग काढू. पाटील कुटुंबीयाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू.
आमदार सत्यजित देशमुख.
दोन महिन्यांत बिबट्याचे मनुष्यावर हल्ले वाढले आहेत. त्याला मारण्याची परवानगी द्या,अशी मागणी आम्ही अनेक दिवस करत आहोत. बिबट्या नरभक्षक होत आहे, तरीही वन विभाग मूग गिळून गप्प आहे. यावर तोडगा निघालाच पाहिजे.
माजी आमदार मानसिंगराव नाईक.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .




.jpg)
0 Comments