शिराळा,ता.१९:सोमवारी(ता.१७)रोजी नागपंचमी उत्सवादरम्यान शिराळा शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिलांचे अश्लील व बीभत्स नृत्य सुरू ठेवल्याप्रकरणी शिराळा पोलिसांनी १६ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत.अजून उर्वरित मंडळावर व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी,सोमवारी १७ ऑगस्ट रोजी नागपंचमी उत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान काही मंडळांनी मिरवणुकीत महिलांचे नृत्य आयोजित केले होते.या नृत्याचे स्वरूप अश्लील व बीभत्स असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी संबंधित मंडळांना ते तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या.मात्र,समज देऊनही नृत्य सुरूच ठेवल्याने संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यामध्ये एम कंपनी नागराज मंडळ,कोटेश्वर नागराज मंडळ,श्री नागराज मंडळ,रेणुका नागराज मंडळ,संयुक्त नागराज मंडळ,श्री गणेश नागराज मंडळ,ओम सिद्धी विनायक नागराज मंडळ, कीर्ती कुमार नागराज मंडळ,कच्चाड नागराज मंडळ,चव्हाटा नागराज मंडळ,चेतक नागराज मंडळ,नागाची तालीम नागराज मंडळ,एचटीएम नागराज मंडळ,फ्रेंड सर्कल नागराज मंडळ, क्रांती नागराज मंडळ,युवा साम्राज्य नागराज मंडळ या सोळा नागराज मंडळावर कारवाई करण्यात आली आहे.अजूनही उर्वरित मंडळावरती कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे,तसेच ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळावर सुद्धा कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे

0 Comments