BREKING NEWS ----- --शिराळ्यात अंबरनाथची बैलजोडी ठरली सम्राट केसरीची मानकरी --------------------------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गीतकार विजय शिंदे | Lyricist Vijay Shinde


गीतकार विजय शिंदे | Lyricist Vijay Shinde

खालील गाण्यावर क्लिक करून गाणे ऐका 

 

 मोकळ्यावेळेतील वाचनाने व कोरोना काळातील सादरीकरणाने विजयच्या आयुष्याला कलाटणी देवून साहित्यसंपदेने  चित्रकाराची मनातील खंत दूर करत गीतकाराची सोनेरी किरणे आयुषात आल्याने चालकाच्या हाती आता गाण्याचे स्टेअरिंग आले आहे. त्यामुळे शिराळच्या मातीत नवोदित गीतकार विजयचा  बोलबाला सुरु झाल्याने त्याच्या गीतांनी समाजमाध्यमावर धुमाकूळ घातला आहे.   

गीतकार विजय शिंदे | Lyricist Vijay Shinde

 शिराळा तालुक्यातील दुंरदेवाडी येथील विजय शिंदे हा  युवक नवोदित गीतकार म्हणून समाज माध्यमातून नावारूपास येवू लागला आहे. घरची परीस्थिती बेताची असल्याने त्याने  उदरनिर्वाहासाठी मुंबईत दहा वर्षे दुधाच्या टँकरवर काम केले. आता खाजगी गाडीवर चालक म्हणून काम करत आहे. आपले काम संपल्यावर  रिकाम्या वेळी टाईमपास म्हणून वाचत असलेल्या वर्तमानपत्रातील वेगेवगळे वैचारिक लेख,माहिती,कथा, कविता वाचून त्याला लिखाणाची आवड निर्माण झाली.दरम्यान सैराट चित्रपट आला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या जीवनप्रवासाबद्दल माहिती त्याच्या वाचनात आली. त्यातून  त्याला लेखनाची  उर्जा मिळाली. त्यातून  लवंगाट ही पहिली  प्रेम कथा लिहिली. दरम्यान  अँड्रॉइड मोबाईल हाती आल्याने फेसबुकवर साहित्य ग्रुप शोधून . ती कथा ग्रुपवर पाठवली. 

गीतकार विजय शिंदे | Lyricist Vijay Shinde

त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. हळूहळू  साहित्याच्या  १५ व्हाट्सअप  ग्रुपमध्ये सहभागी झाल्याने  साहित्या बद्दल देवाणघेवाण सुरु झाली. दरम्यान  फेसबुकवर गझल वाचून त्या सदृश्य रचना  केल्या. त्या ग्रुपवर शेअर केल्या नंतर त्यात असणाऱ्या अनेक त्रुटीबाबत पुणे येथील गझलकार शशिकला बनकर यांनी  दिलेल्या कानमंत्रावरून चांगल्या प्रकारे गझल लिहिल्या. मात्र  या गुरुशिष्यांचे फोनवर अद्याप एकदा ही बोलण झालेले नाही. केवळ व्हाटस अप मेसेजवर अजून ही मार्गदर्शन सुरु आहे.  गाणी लिहिण्याचे  तासंतास वेड लागल्याने  कामाकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने कुटुंबात चिडचिड निर्माण झाली. पण गाण्याचे वेड त्यास स्वस्थ बसून देत नव्हते. त्यावेळी विजयने मी जे गीत लिहितोय ते गाजले  नाही तर लिखाण सोडून देईन असे आश्वासन घरच्यांना दिले. 

गीतकार विजय शिंदे | Lyricist Vijay Shinde

त्याने लिहिलेल्या "नंबर दे ना तुझा गं पिल्लू"  या  पहिल्या प्रेमगीताला  संगीतबद्ध केले .त्या गाण्याने समाजमाध्यमावर धुमाकूळ घातला.तो प्रतिसाद पाहून पुढील गाण्यासाठी त्यास  संतोष साळुंखे, अंकुश पार्टे -पाटील, अजित जाधव,पोपट शिंदे, मारुती मोंडे, धनंजय खोत, बाळू खोत, विनोद पन्हाळकर, या मित्रांनी आर्थिक पाठबळ दिले. त्यामुळे विजयाच्या लेखणीला आणखी हत्तीचे बळ मिळाले. गीतांचा प्रवास सुरु झाला. कोरोना काळात विजयने ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या साहित्य संमेलनात आपल्या साहित्या रचनेची चुणूक दाखवून आपल्याकडे असणाऱ्या साहित्य संपदेचा वेगळा ठसा उमटवून साहित्य क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण केले.त्याची आम्ही ३२ शिराळकर हाय, ये सोनू रिप्लाय तू देना,  चल फिरून येऊया राणी गुवाहटीची डोंगर झाडी, अशी २७ गाणी ध्वनिमुद्रित झाली आहेत.तर ग्रामीण भागातील देवांची , प्रचार गीते यांना ही चांगली मागणी येवू लागली आहे.

गीतकार विजय शिंदे | Lyricist Vijay Shinde

 लहानपणी चित्रकाल चांगली असल्याने चित्रकार होण्याचे स्वप्न होते.पण परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले.वाचनाने लिखाणाची आवड निर्माण झाल्याने सर्व विषयाला स्पर्श करणारे लिखाण करू लागल्याने चित्रकार नसलो तरी गीतकार झालो याचा आंनद  आहे.  

विजय शिंदे नवोदित गीतकार 

गीतकार विजय शिंदे | Lyricist Vijay ShindePost a Comment

0 Comments