BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

म्हणून त्यांनी पंतप्रधानांना पाठवल्या शेणी आणि गोवऱ्या

 

शिराळा,ता.४:  शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सतत वाढणाऱ्या घरगुती गॅसच्या किमतीच्या विरोधात आंदोलन करून  येथील पोस्ट कार्यालयातून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना शेण्यांचे (शेणकुटे/गोवऱ्या) पार्सल पाठवण्यात आले. यावेळी सतत होणाऱ्या दर वाढी विरोधात घोषणा देण्यात आल्या.

 या आंदोनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष साधना पाटील  यांनी केले. आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सौ. सुनितादेवी नाईक, जिल्हा परिषद सदस्या सौ. अश्विनीताई नाईक ,सौ. दिपालीताई नाईक प्रमुख उपस्थित होत्या. 

येथील अंबामाता मंदिराजवळ एकत्रित येऊन महिलांनी सतत केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या दरवाढीविरोधात घोषणा दिल्या. गॅस, पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अन्नधान्य, गोडेतेल यांच्यासह महागाईने उच्चांक गाठला आहे. यामध्ये मध्यम, सामान्य, शेतकरी व कष्टकरी करणारा वर्ग भरडला जातोय. केंद्र सरकारने महागाई रोखण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी केली.

या आंदोनात पंचायत समिती सभापती वैशाली माने, नगराध्यक्षा सुनिता निकम, नगरसेवक प्रतिभा पवार, सुनंदा सोनटक्के, सुजाता इंगवले, महिला शिराळा शहर अध्यक्ष वंदना यादव, वैशाली कदम, अर्चना कदम, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments