शिराळा : आज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल, रासायनिक खते, घरगुती वापरासाठीच्या गँस सिलेंडरच्या दरवाढी निषेधार्थ तहसील कार्यालयाच्या दारात जाहीर निषेध व आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व आमदार मानसिंगराव नाईक, यांनी केले. केंद्र सरकारने केलेली दरवाढ सर्वसामान्य व शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. कोरोना महामारीने आगोदरच कंबरडे मोडले आहे. त्यातच केलेली दरवाढ केंद्र सरकारने त्वरीत मागे घ्यावी. ती न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, युवा नेते विराज नाईक, माजी सभापती सम्राटसिंग नाईक, दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, तालुक्याच्या सभापती वैशाली माने, उपसभापती बी. के. नायकवडी, संचालक सर्वश्री दिनकरराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, विश्वास कदम, डॉ. राजाराम पाटील, बिरुदेव आमरे, मानसिंग पाटील, शिराळा नगराध्यक्ष सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुनील कवठेकर, बाजार समिती उपसभापती नंदाताई पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल पवार, युवती राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पौर्णिमा पवार, विद्यार्थी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रथमेश शिंदे, नगरसेवक किर्तीकुमार पाटील, संजय हिरवडेकर, वकील विलास झोळे, सागावचे सरपंच तात्यासो पाटील, अनिरुध्द नलवडे, गजानन पाटील आदी उपस्थित होते.

न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

ख्वाईश लघुचित्रपटाची झलक



पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  


--------------------------------------------------------------------




शिराळा कृषी उत्पन्न बाजार

 

समिती येथे सुरू झाले  'शिव

 

भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 

मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 

उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा