BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिक्षकांच्या जवळ नवचैतन्य आणि प्रबळ ईच्छाशक्ती असेल तर अतिदूर्गम परिसरातही ज्ञान अंकुर जन्म घेतो-प्रदिपकुमार कुडाळकर

 


 शिराळा:शिक्षकांजवळ नवचैतन्य आणि प्रबळ ईच्छाशक्ती असेल तर..अतिदूर्गम परिसरातही ज्ञान अंकुर जन्म घेतो, असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी मा.श्री.प्रदिपकुमार कुडाळकर साहेब यांनी केले. ते जिल्हा परिषद शाळा धनगरवाडा - खुंदलापूर (केंद्र वारणावती) येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने आयोजित शाळा भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मा. केंद्रप्रमुख सौ. मधुवंती धर्माधिकारी म्हणाल्या की, प्रत्येक शिक्षकाजवळ नवनिर्माणक्षमता, दूरदृष्टी आणि अखंड कार्यक्षमता असायला हवी. या कार्यक्रमाच्या वेळी श्री. मोहन पवार सर(मुख्याध्यापक-जिप.शाळा सिद्धार्थनगर - आरळा), शाळेचे मुख्याध्यापक श्री.माधव पवार सर, उप शिक्षक श्री. महादू कोंडार सर, मेजर नवलू गावडे, श्री. नामदेव गावडे(शा.व्य.स.अध्यक्ष), श्री. धाकलू गावडे(पो.पाटील) इ. मान्यंवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. नवलू गावडे यांनी जिल्हा परिषद शाळेला सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

      डोंगराळ भागात, अतिदूर्गम, अतिपर्जन्याच्या क्षेत्रात व घनदाट अशा चांदोली अभयारण्य क्षेत्रात अगदी जीव मुठीत धरून काम करत असूनही शालेय रेकाॅर्ड सुव्यवस्थित व परिपूर्ण, शालेय स्वच्छता उत्तम, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने डिजीटल शाळा व काँक्रिटीकरण, दर्जेदार ग्रंथालयाची निर्मिती,१००% दाखलपात्र विद्यार्थी प्रवेश, कार्यालयाचे श्री. कोंडार सरांच्या सुंदर हस्ताक्षरांनी सुशोभिकरण अशी अनेक उल्लेखनिय व उत्कृष्ट कामे केल्याबद्दल श्री. कुडाळकर साहेबांनी दोन्ही शिक्षकांचे अभिनंदन करून सत्कार केला.

        या कार्यक्रमा दरम्यान जि.प.शाळा सिद्धार्थनगर(आरळा) येथील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. मोहन पवार सर यांनी विद्यार्थ्यांना स्व:खर्चातून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

       

Post a Comment

0 Comments