BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे मोबाईल दुकानात चोरी

 


शिराळा,ता.१३: शिराळा येथील सोमवार पेठ या मुख्य बाजारपेठेतील विजय मोबाईल शॉपीची कौले काढून दुकानातील मधून अज्ञात चोरट्यानी ३० हजार रुपयांचे मोबाईल विविध मोबाईलचे साहित्य चोरून नेले.सदर घटना रविवार रात्री घडली.एक वर्षात हे दुकान तिसऱ्यांदा फोडले आहे.

     याबाबत राजेंद्र रामलिंग कानकात्रे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या दुकानाचे कौले काढून चोरी केली आहे. या दुकानातील दुरुस्ती साठी आलेले ४ मोबाईल,चार्जर,हेडफोन,बॅटरी आदी ३० हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. तपास हवालदार कालिदास गावडे हे करीत आहेत.

 गोपाळ कृष्ण पथ येथील हणमंत उर्फ बाबुराव वासुदेव जोशी यांचे बंद दरवाजाचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील तसेच इतर साहित्य विस्कटले मात्र घरात कोणी नसलेने नेमके काय चोरीस गेले याची माहिती समजू शकले नाही.पाडळी नाका येथील श्रावणी ब्युटी पार्लर चे कुलूप तोडले मात्र चोरीस काही गेले नाही.

Post a Comment

0 Comments