BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नाग हाताळल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 


शिराळा, ता.१३: कापरी (ता.शिराळा) येथील कडवेकर मळ्यातील दत्तनगर येथे नाग हाताळल्या प्रकरणी ४६ वर्षीय इसमावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.जप्त केलेल्या नागास नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी यांनी दिली.

यावेळी गोसावी म्हणाले, सांगली वनविभाग अंतर्गत शिराळा वनपरिक्षेत्रातील शिराळा येथील नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस व वनविभाग यांचा बंदोबस्त ठेवला होता. या बंदोबस्त दरम्यान पथक फिरत असताना दत्तनगर कडवेकर मळा कापरी येथे एका ४६ वर्षीय इसमाला नाग हाताळत असताना ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून हस्तगत केलेला एक नाग जप्त करून त्यास नैसर्गिक आदिवासात मुक्त केले आहे.

पुढील तपास उपवनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments