BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नावा प्रमाणे जनतेचा उत्कर्ष करणारी जनउत्कर्ष पतसंस्था

 

शिराळा: शिराळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जनउत्कर्ष पतसंस्थेच्या चौथ्या शाखेचे उदघाटन आमदार मानसिंगराव नाईक,माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते झाले.

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले,ग्रामीण भागात पतसंस्था टिकवणे हे मोठे आवाहन आहे.ते आवाहन पेलत जनउत्कर्ष पतसंस्थेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक    म्हणाले, जनउत्कर्ष ही पतसंस्था खरोखर नावा प्रमाणे जनतेचा उत्कर्ष करणारी संस्था आहे.कोरोनाच्या काळात वसुलीचे चांगले नियोजन करून सभासदांना ९ टक्के लाभांश देऊन सर्वाना दिलासा दिला आहे. सर्वजण कोरोनाच्या काळात अडचणीत असताना संस्थेने शासकीय नियमांचे पालन करुन फक्त व्याज भरुन घेऊन कर्जालामुदत वाढ देउन सर्व सामान्य माणसाला या पत संस्थेने आधार दिला आहे 

 जि प सदस्य संपतराव देशमुख म्हणाले, या संस्थेने नेहमीच सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच  विश्वास व प्रामाणिकतेच्या जोरावर संस्थेचा शाखा विस्तार सुरू आहे.

यावेळी सभापती वैशाली माने, नगराध्यक्षा सुनीता निकम , सहाय्यक निबंधक डि .एस. खताळ ,बाजार समिती सभापती सुजीत देशमुख, माजी सभापती हणमंतराव पाटील, माजी सभापती सम्राटसिंह नाईक, मुख्य मानव संसाधन अधिकारी बाजीराव खांडेकर ,बाजार समिती उपसभापती नंदाताई पाटील, नगरसेविका नेहा सूर्यवंशी, नगरसेविका सीमा कदम, भटवाडीचे सरपंच विजय महाडिक,माजी जिल्हापरिषद सदस्य के.डी.पाटील, चेअरमन मारुती शिंदे ,व्हा चेअरमन सौ इंदुताई भाष्टे ,  संचालक शांताराम जाधव, जनार्दन कांबळे, राजाराम मस्के, विष्णू सावंत, आनंदराव जाधव, रघुनाथ धुमाळ, संजय  गुरव, शिवाजीराव चौगुले, तानाजी आटूगडे, शोभा पाटील, सदाशिव गायकवाड, अंजना गायकवाड, वकील नरेंद्र सूर्यवंशी, सभासद उपस्थित होते.



  स्वागत के.वाय. भाष्टे यांनी तर प्रास्ताविक  संस्थापक विजयसिंह खांडेकर  यांनी केले.  आभार संचालक अशोक लोहार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments