BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सुरुलच्या सरपंच सौ. कुंदाताई पाटील यांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

 

सुरुल (ता वाळवा) येथील भाजपाच्या लोकनियुक्त सरपंच व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक समर्थक सौ. कुंदाताई पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व अकरा सदस्य व इतर मान्यवरांनी आज भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थितीत होते. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील,  राजारामबापू पाटील बँकेचे संचालक संजय पाटील, माजी सरपंच संदेश पाटील उपस्थित होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, स्वप्नाली मदने, भानुदास कांबळे, सेवा सोसायटी अध्यक्ष जगन्नाथ यशवंत पाटील, उपाध्यक्ष एस. आर. पाटील, माजी अध्यक्ष सेवा सोसायटी शिवाजी पाटील, माजी उपसरपंच धनाजी पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, कॅप्टन राजाभाऊ पाटील, मधुकर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पाटील, साहेबराव पाटील, अनिल शेवाळे, सोसायटी सदस्य सर्वश्री. उत्तम शेवाळे, धनाजी पाटील, संदीप पाटील, साहेबराव पाटील, विश्वास पाटील, प्रकाश पाटील, मारुती बंडगर, शिवाजी गुरव, विजया पाटील, कांताबाई पाटील आदींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांचा सत्कार व स्वागत मंत्री मा. ना. पाटीलसाहेब व आमदार नाईक यांनी केले. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments