BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या कुटुंबाच्या डोळ्या देखत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला;अन् त्यांनी काढला खिडकीतून फोटो

 


शिराळा:  पुदेवाडी (ता.शिराळा) फाट्यावरील वाटेगाव नजीक असणाऱ्या  रामचंद्र मारूती हिंगणे यांच्या बंगल्यासमोरील पोर्च मध्ये बांधलेल्या दोन महिन्याच्या कुत्र्यास बिबट्याने हल्ला करून ठार  केले.डोळ्यादेखत घडलेल्या प्रकारामुळे हिंगणे कुटुंब भयभीत झाले आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. याबाबत समजलेली माहिती अशी,  बांबवडे-शिराळा रस्त्याच्या पश्चिम बाजूला रामचंद्र हिंगणे यांचा बंगला रस्त्याकडेला आहे. शुक्रवारी रात्री सगळे घरात टीव्ही लावून बघत बसले होते.यावेळी अचानक बाहेर  पोर्चमध्ये कुत्र्याचा आवाज येऊ लागला . यावेळी घरातील लोकं बाहेर आली यावेळी बिबट्या कुत्र्याला ओढत असल्याचे त्यांना दिसले.बाहेर बल्ब सुरू होता .उजेडात येत बिबट्याने हा हल्ला केला.लोकांना पाहून बिबट्या कुत्र्याला सोडून नाहीसा झाला.दिलीप हिंगणे यांनी पुन्हा ठार झालेल्या कुत्र्याला आहे तसेच दोरीला बांधले.काही वेळाने पुन्हा बिबट्याने प्रवेश करीत कुत्र्याला ओढण्याचा प्रयत्न केला.परंतु दोरीला बांधल्यामुळे बिबट्याला कुत्र्याला न्हेता आले नाही.यावेळी घराच्या खिडकीतून दिलीप यांनी बिबट्याचा फोटो काढला.नंतर पुन्हा बिबट्या नाहीसा झाला.हिंगणे यांच्या लक्षात आल्यांनार कुत्र्याला दोरीने न बांधता तसेच आहे त्या ठिकाणी ठेवले व घरातील व बाहेरील बल्ब बंद केले.काही वेळाने पुन्हा बिबट्या कुत्र्याला घेऊन पसार झाला.वाटेगाव परिसरात ही दुसरी घटना असून दोन दिवसांपूर्वी वाटेगाव येथील रामोशी दरा येथे एका शेळीचा फडशा पाडला होता. 


Post a Comment

0 Comments