BREKING NEWS -----स्कार्पीओ दरीत कोसळून पाच जखमी -----शित्तूर -आरळा पूल पाण्याखाली --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

व्हेल उलटी तपासाचे धागेदोरे समुद्रकिनारी Stranded beaches of whale vomit investigation

 

शिराळा,ता.१७ :सागाव ( ता.शिराळा ) येथे सापडलेल्या व्हेल मासा उल्टी  (अंबरग्रीस ) तस्करीच्या  तपासासाठी  वनविभागाने दोन पथके तयार केली आहे. या पथकाच्या माध्यमातून सापडलेल्या आरोपींचे आणखी पोलीस रेकोर्ड कुठे गुन्हेगारीचे धागेदोरे सापडतात का याची तपसणी सुरु आहे. त्यांच्या  मोबाईल लोकेशनची व संभाषणाच्या माहितीचे  संकलन सुरु आहे.यामध्ये काही महिलांचा ही समवेश असल्याची शक्यता आहे. पथकाच्या हाती अद्याप ठोस असे काही लागले नसले तरी याचे धागेदोर हे थेट समुद्र किनारी जोडले गेलेले आहे. त्या दृष्टीने वन विभागाने तापस यंत्रणा गतिमान केली आहे.  

या मध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट असलेची शक्यता आहे का याची माहिती घेण्यासाठी व इतर आरोपींच्या  शोधासाठी राज्यातील वेगवेगळ्या  ठिकाणी  उपवनसंरक्षक निता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक  वनसंरक्षक डॉ. अजित साजणे ,मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील  यांच्या  नेतृत्वाखाली पथके कार्यरत  झाली आहेत. शुक्रवारी  (ता.१५)  रोजी  व्हेल मासा उल्टी  (अंबरग्रीस ) तस्करी प्रकरणी  सांगली,कोल्हापूर,लातूर जिल्ह्यातील  रोहन सर्जेराव पाटील (वय  २९ रा. कोनवडे ता. भुदरगड जि. कोल्हापूर), प्रथमेश सुरेश मोरे (वय २३ वर्षे रा.सोळंबी, ता. राधानगरी,जि. कोल्हापूर) , दिग्विजय उत्तम पाटील (वय २४ रा.सागाव, ता.शिराळा, जि. सांगली ), लक्ष्मण सुखदेव सावळे ( वय  ३४ रा.लातूर सध्या रा. कळंबोली मुंबई ) ,दत्तात्रय आनंदराव पाटील ( वय वर्षे ४१ रा. बिऊर ता. शिराळा, जि. सांगली) या पाच जणांच्या  टोळीला बनावट ग्राहकाच्या मदतीने  सागाव येथे  वन विभागाने मोठ्या शिताफीने अटक करून   त्यांच्या कडून  ८ ग्रॅम उलटी चा नमुना ,पाच मोबाईल,दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्यांना  गुरवार ता.२१ डिसेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.पुढील तपासात आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस होण्याची दाट शक्यता असून  तपासात आणखी नावे निष्पन्न होण्याची शक्यता  आहे. त्यामुळे दोन  वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून  शोध  मोहीम सुरु आहे.उपवनसंरक्षक निता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक  वनसंरक्षक डॉ. अजित साजणे ,मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील  यांच्या  नेतृत्वाखाली ही कारवाई वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल अनिल  वाजे, वनरक्षक हणमंत  पाटील, विशाल डुबल,भिवा कोळेकर,रजनिकांत दरेकर,बाबासो गायकवाड,मोहन सुतार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या  पथकाने तपास यंत्रणा गतिमान केली आहे.

तपासासाठी दोन पथके तयार केली आहेत.आज ठोस असे काही हाती लागले नसले तरी प्राथमिक तपासानुसार याचे धागेदोर हे थेट समुद्र किनारी असल्याची शक्यता आहे. त्या नुसार आम्ही तपास यंत्रणा गतिमान केली आहे.

डॉ. अजित साजणे ( सहायक  वनसंरक्षक)


Post a Comment

0 Comments