BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

३०० कामगारांचा सन्मान करून केला वर्धापनदिन साजरा Anniversary celebrated by honoring 300 workers

 


शिराळा ,ता.९ : येथील शिवस्वराज्य कन्स्ट्रक्शन उद्योग समुहाचा ४ था वर्धापन दिन विविध क्षेत्रातील कामगारांचा सन्माना करून उत्साहात साजरा करण्यात आला..यावेळी  शिराळा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, डॉ. प्रकाश पाटील, संकल्प सेवाभावी संस्था कणदुरचे अध्यक्ष कृष्णात सुतार,अमित ट्रेडींग कंपनी शिराळाचे उदय गायकवाड, मेट्रो सेल्स इस्लामपूरचे अक्षय पाटील,राजीव लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी  सहायक गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार म्हणाले, शांत आणि संयमी प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या शुभमने कामगारांना सोबत घेवून मोठे यश संपादन करावे. कामगारांचा असा सन्मान जिल्हयातच नव्हे तर राज्यात पहील्यांदाच होत असावा .

राजीव लोहार म्हणाले, सांगली, कोल्हापूर जिल्हयासह शिवस्वराज्य कंन्स्ट्रक्शन ने आपल्या कार्य कक्षा रूंदवाव्यात. अनेकांच्या  हाताला रोजगार उपलब्ध करून दयावा. गेल्या चार वर्षांतील या उदयोग समुहाचे कार्य कौतुकास्पद आहे. तरूण अभियंते शुभम महामुनी यांचे कामगारांवर असलेले प्रेम, आपुलकी, माया यामुळे या समुहाची यशस्वी घौडदौड सुरू आहे. कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करून सर्वांना आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळत आहेत.

 शुभम महामुनी म्हणाले, प्रामाणिकपणे काम करत आहे. व्यवसाय व्यवसाय न मानता कामगारांप्रती आपुलकी सांभाळत आहे. त्यांची साथ मोलीची आहे म्हणूनच यश मिळत आहे. 

प्रारंभी शिवस्वराज्य कंन्स्ट्रक्शनचा लोगो असलेल्या टि शर्टचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते  करून  ३०० हुन अधिक कामगारांना दिवाळी भेटवस्तूचे वाटप करण्यात आले .यावेळी  खुदाई कामगार, जेसीबी, भराव, पाणी पुरवठा, ब्रेकर, सेंट्रींग ग्रुप, बांधकाम व प्लास्टर ग्रुप, फरशी कामगार, पेंन्टींग, लाईट फिटींग, प्लंबींग, फॅब्रीकेशन, पीओपी, दरवाजे खिडक्या कामगार, रोलींग, वॉटर प्रुपींग, स्लॅब टिम, वाहतूक अशा बांधकाम क्षेत्राशी निगडीत कामगारांचा सत्कार  करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक  प्रदिप महामुनी यांनी केले.कार्यक्रमास  गणेश लोहार,मनिषाताई लोहार यांच्या सह विविध क्षेत्रातील कामगार उपस्थित होते. आभार अशोकराव लोहार  यांनी मानले.


Post a Comment

0 Comments