BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली पर्यटनाचा आराखडा तयार करा

 



शिराळा,ता.२७:शिराळा व चांदोली पर्यटन आणि शेती विकासवर भर द्या.पर्यटन वाढीच्या दृष्टीने सक्षमपने सुरु होणाऱ्या तालुक्यातील महत्वाच्या १० ते १२ गोष्टीवर लक्ष केंद्रित करा.रोजगारा अभावी शिराळा तालुक्यातील तरुण बाहेर जातात हे आपले अपयध आहे.त्यामुळे पर्यटन विकासातून त्यांना रोजगार मिळाला पाहिजे असा पर्यटन आराखडा १५ दिवसात सर्व विभागाने तयार करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

शिराळा येथील तहसील कार्यालयात जागतिक पर्यटन दिन व चांदोली पर्यटन बाबत आयोजित बैठकीत बोलत होते.यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी काकडे म्हणाले,सर्व विभागाने चांदोलीचा विकास डोळ्यासमोर ठेवून आराखडा तयार करा.यामध्ये २० टक्के शासन ८० टक्के खासगी गुंतवणूक असेल.पर्यटन विकासासाठी लागणारी जमीन,प्रशिक्षणसाठी येणारा खर्च यांचा प्रामुख्याने विचार करा.

.आमदार सत्यजित देशमुख म्हणाले,शेवताई,झोळंबी, तांबवे,उदगिरी येथे ट्रेकिंग सुविधा व मेडिटेशन केंद्र व जनीचा आंबा ते कंदहार धबधब्या पर्यंत बोटिंग सुरु करा.पर्यटनाला चालना देण्यासाठी डिसेंबर ते मे महिन्या दरम्याना कमीत कमी चार वेळा चांदोली महोत्सवाचे आयोजन करा.शिराळा येथे भुईकोट किल्ला येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात त्यांचा जीवन पट व त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी लाईट शो व साऊंड शो उभारावा.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प,कोल्हापूरचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण म्हणाले,महाबळेश्वर ते राधानगरी पर्यंत सह्याद्रीच्या पट्टयात पूर्वापारपासून वाघाचा संचार आहे.आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ असून अजून ८ वाघ सोडण्यात येणार आहेत.त्या पैकी डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्यात पेंच व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघीण आणण्यात येणार आहेत.त्यासाठी  ऑपरेशन‘तारा’राबविण्यात येणार असल्याने ताडोबा व पेंच प्रमाणे आपला सह्याद्री प्रकल्प होण्यास मदत होईल.त्यामुळे प्रकल्पात वाघाचे दर्शन दुर्मिळ राहणार नाही.सध्या वाघांना अन्नाची कमतरता भासणार नाही.वाघाला जंगलाचा अधिवास लागतो.तो जंगल मार्गाने जातो.बिबट्या प्रमाणे जंगल सोडून बाहेर जात नाही.वाघाची संख्या वाढल्यास पर्यटनाला चांगला वाव मिळणार आहे.लोकांची उपजीविका वाढेल.पर्यटकांना माहिती देण्यासाठी स्थानिक लोकांना गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यावेळी इको टुरिझम,जंगल सफारी,पायवाट,पक्षी निरीक्षण ठिकाण,पर्यटकांच्यासाठी शिराळा,चांदोली, इस्लामपूर,कराड माहितीकेंद्र सुरु करणे,गाईडसाठी प्रशिक्षण,ऑनलाईन बुकिंग सुविधा.पर्यटकांसाठी तंबू,होम स्टे या ठिकाणाचा शोध घेणे,कृषी पर्यटन साठी शेडगेवाडी ते चांदोली पर्यंत ठिकाण शोधणे,निसर्ग भटकंतीसाठी रोप वे,ट्रॅकिंग मार्ग,चांदोलीकडे येणाऱ्या पर्यटकांच्यासाठी सांगली-कोल्हापूर-रत्नागिरी-सातारा हा रस्ता चांगले करणे,या मार्गांवर ठीक ठिकाणी दिशादर्शक बोर्ड लावणे,पार्किंग,स्थानिक खादय पदार्थ, लोककला,सांस्कृतिक कार्यक्रम,उद्योगसाठी लागणारे कर्ज पुरवठा करणे.पर्यटनाशी निगडित असणाऱ्या योजनाची माहिती संकलित करणे,शिराळा तांदूळ,नाचणी,आंबा,फणस,देशी पावटा,यांची शेती विकसित करणे,शिराळा नागपंचमी,अंबाबाई,गोरक्षनाथ,हनुमान मंदिर,गिरजवडे जोतिबा मंदिर,शेवताई मंदिर येथे पर्यटन वाढ करणे,वॉटर ए.टी.एम,शौचालय सुविधा,सांडपाणी शुद्धीकारण योजना,ई रिक्षा,डिजिटल मार्केटिंग सुविधा,महिलांना कॅन्टींग,कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रांतधिकारी श्रीनिवास अर्जुन,तहसीलदार शामला खोत पाटील यांच्या सह इतर सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.

व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



Post a Comment

0 Comments