BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या बँकेवर प्रशासक नियुक्ती


सर्जेरावदादा बँकेवर प्रशासक नियुक्ती

शिराळा,ता.१९:१७ पैकी ११ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे रिझर्व्ह बँकेने सर्जेरावदादा नाईक बँकेवर प्रशासक  नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्जेरावदादा नाईक बँके मार्फत करण्यात आलेले कर्जवाटपाच्या वसुलीस लॉक डाऊनमुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्राधान्याने वसुली करून खातेदारांचे पैसे दिले जातील.त्यामुळे खातेदारांनी पैशासाठी गर्दी करू नये. पैश्यांची वसुली व हातातील शिल्लक याद्वारे आम्ही खातेदारांच्या घरी पैसे देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक आदिनाथ दगडे यांनी दिली.
   येथील सर्जेरावदादा नाईक बँकेवर रिझर्व्ह बँकेमार्फत प्रशासक म्हणून आदिनाथ दगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी पदभार स्वीकारल्यावर ही माहिती दिली.
    यावेळी दगडे म्हणाले, या बँकेचे सांगली, सातारा , कोल्हापूर जिल्ह्या कार्यक्षेत्र आहे.लॉक डाऊनमुळे वसुली व मुख्य शाखेशी संपर्क साधने अवघड होत आहे. कर्जदारांनाही अडचणी येत आहेत. १७ संचालकांपैकी ११ जणांनी राजीनामा दिले आहेत. यामुळे रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
   यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, पांडुरंग कुंभार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments