BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू


 अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

शिराळा, ता.१९:वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा ) येथे करमजाई मंदिरा जवळ पडवळवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेने नर जातीच्या आठ ते दहा महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला आहे. 

ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या पूर्वी घडली.याबाबत समजलेली माहिती अशी वाकुर्डे बुद्रुक ते पडवळवाडी या मुख्य रस्त्या लागत झाडी जवळ बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.  याबाबत वनविभाग शिराळा यांना माहिती देण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांच्यासह वनपाल चंद्रकांत देशमुख, सचिन पाटील,देवकी ताहसीलदार, प्रकाश पाटील,दादू शेटके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी  त्यावेळी अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. रस्त्यावर खर्चटलेल्याच्या खुणा आढळून आल्या. पंचनामा नामा करण्यात आला.रात्र असल्याने उद्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यामुळे बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो वनविभाग वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आला आहे.

आत्ता पर्यंत ९बिबट्यांचा मृत्यू

शिराळा तालुक्यात सात व वाळवा तालुक्यात एक अशा ८ बिबट्याचा मृत्यू झाला होता.आज वाकुर्डे येथे मृत्यू झाल्याने आता पर्यंत मृत्यू झालेल्या बिबट्यांची संख्या ९झाली आहे.

Post a Comment

0 Comments