BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : सांगली जिल्हयातील वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून  आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
   कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील 1) जगन्नाथ दादू वायदंडे यांचे घर ते आनंदा रामचंद्र भोपळे यांचे घर
 2) आनंदा रामचंद्र भोपळे यांचे घर ते चॉदसो सिलेमान पटेल यांचे घर 3) चॉदसो सिलेमान पटेल यांचे घर ते आनंदा पांडुरंग पवार यांचे घर
4) आनंदा पांडुरंग पवार यांचे घर ते जगन्नाथ दादू वायदंडे यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.


Post a Comment

0 Comments