BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली जिल्ह्यात आज पाच कोरोना बाधित तर तीन कोरोना मुक्त


सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात पाच जण कोरोणाबाधित तर तिघे कोरोणामुक्त--जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी

सांगली दि.16 (जि. मा .का)
कडेगाव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये असणाऱ्यांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .
तर सांगलीतील लक्ष्मी नगर (साखर कारखान्या जवळ) येथील एकाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
साळशिंगी , ता खानापूर येथील आठ वर्षीय मुलाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

तर दुधेभावी येथील कोरोना बाधीत रुग्णाशी संबंधित दोघांची पंधरा दिवसानंतरची कोरोणा चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच घोरपडी येथील रुग्णाची पंधरा दिवसानंतरची कोरोणा चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 50 जणांची कोरोणा चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यापैकी 32 जण कोरोणामुक्त झाले आहेत. एका रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. तर  17 कोरोणा बाधित सध्या उपचाराखाली आहेत.
अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments