BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कृषीपंप वीज बिल माफ करा;आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे पदवीधर युवाशक्ती संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

कृषीपंप वीज बिल माफ करा;आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे पदवीधर युवाशक्ती संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

शिराळा:शेतकऱ्याचे वीजबिल माफ व्हावे यासाठी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने आमदार मानसिंगराव नाईक यांना निवेदन देताना कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे  शिराळा तालुका अध्यक्ष सुरज गायकवाड, उपाध्यक्ष वैष्णव पाटील, दिग्विजय पाटील ,सुमित नांगरे-पाटील, अभिजित साळुंखे
शिराळा, ता.२८: शेतकऱ्याचे वीजबिल माफ व्हावे यासाठी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्यावतीने आमदार मानसिंगराव नाईक यांना निवेदन देण्यात आले आहे.
 या निवेदनात म्हटले आहे,कोरोनामुळे संपूर्ण भारत आज वैश्विक महामारीच्या संकटाला तोंड देत आहे.बाजारपेठा खुल्या नसल्याने असंख्य शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच कुजून गेल्याने त्यांच्या आर्थिक मिळगतीचा मार्ग खुंटले आहेत.ह्यात शेतीपंपाची येणारी मोठ्या रक्कमांची वीजबीले गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत आहे.कोरोनच्या या संकटात घरखर्च सांभाळून शेतीपंपाच्या विजबिलाच्या खर्चाचा मेळ घालणं शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्याबाहेर गेलं आहे. या लॉकडाऊन च्या कालावधीतील साधारणतः तीन महिन्यांची शेतीपंपाची वीजबीले माफ करावीत. किंवा अर्थव्यवस्थेचा विचार करता  निम्मी सवलत तरी द्यावी.
या मागणीसाठी पाठपुरावा कुरु अशी ग्वाही आमदार आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
यावेळी  कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य चे  शिराळा तालुका अध्यक्ष सुरज गायकवाड, उपाध्यक्ष वैष्णव पाटील, दिग्विजय पाटील ,सुमित नांगरे-पाटील, अभिजित साळुंखे उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments