BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात भाजपच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन



शिराळ्यात भाजपच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन

शिराळा,ता.२२: भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात करण्यात आलेल्या "महाराष्ट्र बचाव आंदोलन" शिराळा येथे  भाजप नेते सत्यजित देशमुख यांच्या उपस्थित सामाजिक अंतर ठेवत करण्यात आले. 

यावेळी कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा निषेध काळया पट्ट्या बांधून करून सरकार विरोधात घोषणा देत करण्यात आला.

यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले, कोरोना चे  संकट  हाताळण्या मध्ये हे सरकार अपयशी ठरले आहे, सरकार कडे कोणतेही नियोजन नाही. ढिसाळ कारभारामुळे रुग्णांचे व नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.गेली दोन सव्वा दोन महिन्यापासून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली  असताना सरकार फक्त बघ्याची भूमिका घेवून आहे.  गरिबां चा रोजगार नसल्याने दोन वेळच्या जेवणाची अडचण झाली आहे.  अनेकांच्या हातचा रोजगार गेलाय अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.या सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून हे सरकार पूर्णपणे अकार्यक्षम आहे.  या सरकारने केंद्र सरकार प्रमाणे आर्थिक मदत जाहीर  करावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,  सम्राट शिंदे,  अरविंद शिंदे, जगदीश कदम,  अभिजीत यादव,  अधिक चरापले उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments