BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नरभक्षक बिबट्या अडकला पिंजऱ्यात

 


शिराळा,ता.४ :बिऊर (ता.शिराळा)येथे राजवीर पाटील या सहा वर्षाच्या बालकाला ठार केलेला  नरभक्षक बिबट्याला अखेर पाचव्या दिवशी पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात वनविभाग व रेस्क्यू पथकाला यश आले आहे.त्यामुळे गेले चार दिवस शोध पथकाला हुलकावणी देणारा  शिकारी खुद शिकार बन गया.यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

 गेले चार दिवसापासून बिऊर,उपवळे,कदमवाडी,तडवळे परिसरात त्या बिबट्याचा शोध सुरु होता.मात्र तो काल रात्री पर्यंत  शोध पथकाला हुलकावणी  देत त्याच परिसरात वावरत  होता. वन विभाग पिंजरे व कॅमरे लावून थर्मल ड्रोनद्वारे ही शोध घेत होते.तरी ही हाती लागत नसल्याने  त्याच्या शोधासाठी पुणे येथील डॉग स्कॉड आणून शोध मोहीम गतीमान केली होती .कोल्हापूर येथील मुख्य वनरक्षक (प्रादेशिक)चे जी गुरुप्रसाद व उपवनसंरक्षक सागर गवते यांनी घटनास्थळ व परिसराला भेट देवून बिबट्यास पकडण्यासाठी रेस्कू पथक व वन वन कर्मचारी यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या.आम्ही त्या बिबट्यास निश्चित शोधून काढू असा  विश्वास ही त्यांनी व्यक्त केला होता. बालकावर हल्ला केलेल्या परिसरासह इतर परिसरात बिबट्याचे ठसे,मूत्रविसर्जन,विष्ठा या पुराव्याच्या आधारे डॉग स्कॉड पुढील शोध घेत होते.

  गेले चार दिवस वनक्षेत्रपाल रमेश कांबळे,वनपाल अनिल वाजे यांची उपस्थिती होती.पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे डॉग स्कॉड प्रमुख शोमीत भिडे,शुभम सिंग,रेस्कु टीम चे निनाद ताम्हणकर ,सागर शिंदे,अभिलाष बनसोडे,वनक्षेत्रपाल रमेश कांबळे,वनपाल अनिल वाजे,वनरक्षक दत्तात्रय शिंदे,रजनीकांत दरेकर,प्राणी मित्र प्रा.सुशीलकुमार गायकवाड,धीरज गायकवाड,रेस्क्यू टीम सदस्य शिराळाचे नामदेव शिद,संतोष कदम,कोल्हापूर रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार,अल्माटीन बांदी हे थर्मल ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याच्या शोधासाठी प्रयत्नशील होते. सकाळी बिबट्या सापडल्याची माहिती मिळताच सर्वत्र समाज माध्यमावर त्याचे फोटो फिरू लागले.

आणि त्याने पिंजऱ्यावर पंजा मारला 

संतोष कदम हे सकाळी सहा वाजता कॅमरे व पिंजऱ्यातून भक्ष बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांना पिंजऱ्यावर पंजा मारल्याचा आवाज आला.त्यांनी पाहिले असता बिबट्या कैद झाल्याचे आढळून आले.त्यानंतर रेस्क्यू पथक व  वन कर्मचारी दाखल झाले.     

राजवीर आणि बिबट्याचा  शोध एकाच ठिकाणी संपला 

बिबट्याने राजवीरला गळ्याला पडकून ज्या ठिकाणी नेऊन त्याच्या नरडीचा घोट घेतला त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या  कैद झाला.म्हणजे जिथे राजवीरचा शोध संपला त्याच ठिकाणी बिबट्याचा ही शोध संपला हा एक योगायोग म्हणावा लागेल. 

रात्रंदिवस स्थानिक पथक कार्यरत  

ठिकठिकाणी सहा पिंजरे,प्रत्येक पिंजऱ्यात एक असे सहा बोकड,७ कॅमरे,५थर्मल ड्रोन,एक डॉग स्कॉड , पुणे,कोल्हापूर,व स्थानिक बचाव पथकासह वन विभागाचे ३०हुन अधिक  कर्मचारी प्रयत्नशील होते.मात्र त्या मध्ये  शिराळा येथील सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सनेच्या स्थानिक पथकाचे प्रा,सुशीलकुमार गायकवाड ,धीरज गायकवाड व त्यांचे सहकारी आघडीवर होते.  

पथकाला रात्री दिसला 

रेस्क्यू पथक त्या बिबट्याचा शोध घेत असता बिबट्या उपवळे येथे डुक्करांच्या मागे लागलेला दिसला.त्यामुळे त्यांनी त्यास अटकाव न करता त्याच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले.पहाटे ४वाजुन २० मिनिटांनी पिंजऱ्यात कैद झाला.सकाळी लोकांनी त्यास पाहण्यासाठी गर्दी केली होती.   

अधिवासात नव्हे बिबट निवास केंद्रात 

३ ते ४ वर्षाची मादी बिबट्या असून त्याचे वजन सुमारे ४५ ते ५० किलो आहे. त्यास सांगली येथे उपवनसंरक्षक कार्यालयात  नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.त्या नंतर  त्यास नरभक्षक असल्याने नैसर्गिक अधिवासात न सोडता  पुणे येथे बिबट निवास केंद्रात सोडण्यात आले आहे. 

 ती वेळ माझ्या वैऱ्यावर सुधा येऊ नये

बिबट्या सापडला हे बर झालं.तो सापडल्यावर  पाहिल्यावर मला तो राजवीर ला घेवून जातानाची घटना आठवून अंगावर काटा आला. होणारी घटना कोण टाळू शकत नाही.पण ,जी  वेळ माझ्या पोरावर आली ती माझ्या वैऱ्यावर सुधा येऊ नये ही माझी देवाजवळ प्रार्थना आहे.

हणमंत पाटील (वडील )  


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments