BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिबट्याच्या शोधासाठी पुणे ,कोल्हापूर येथील पथक दाखल


शिराळा ,ता.३:बिऊर(ता.शिराळा)येथील अमृतनगर परिसरात राजवीर हणमंत पाटील या सहा वर्षीय बालकावर हल्ला करून नरभक्षक झालेल्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभागाने गेले तीन दिवसापासून शर्तीचे प्रयत्न व उपाययोजना सुरू केल्या आहेत.मात्र अद्याप त्याचा मागमूस लागलेला नाही,त्यामुळे वन विभागाच्या प्रयत्नांना अधिक बळ देण्यासाठी आज पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व कोल्हापूर रेस्क्यू पथक दाखल झाले आहे.ही दोन्ही रेस्क्यू पथक व वन विभाग कर्मचारी आणि शिराळा येथील स्थानिक रेस्क्यू पथकाचे सर्व सदस्य वेगवेगळ्या तीन पथकांच्या माध्यमातून अत्याधुनिक थर्मल ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेत आहेत.मात्र,अद्यापही या बिबट्याचा ठोस मागमूस लागलेला नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे.

 राजवीरवर ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला त्या परिसरासह तडवळे,उपवळे व बिऊरच्या इतर परिसरात ६ पिंजरे लावण्यात आले आहेत.त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी वेगवेळ्या ठिकाणी ७ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.भक्षाच्या शोधात बिबट्या येईल म्हणून वनविभागाने सहा पिंजऱ्यांमध्ये बोकड ठेवले आहेत.त्यांच्या वासाने तो येण्याची शक्यता होती.मात्र तीन दिवस कर्मचारी विविध ठिकाणी तळ ठोकून आहेत,मात्र त्याने सर्वाना गुंगारा दिला आहे.वन विभागाचे अधिकारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या थर्मल ड्रोन कॅमेऱ्याने त्याचा रात्री शोध घेत आहेत.यामध्ये वनक्षेत्रपाल रमेश कांबळे,वनपाल अनिल वाजे,वनरक्षक दत्तात्रय शिंदे,प्राणीमित्र प्रा.सुशीलकुमार गायकवाड,धीरज गायकवाड,रेस्क्यू पथकाचे युनुस मणेर,नामदेव शिद,संतोष कदम,गौरव गायकवाड, प्रतीक पोळ,पंकज कदम तसेच कोल्हापूर रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार,अल्माटीन बांदी, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे च्या अध्यक्षा नेहा पंचमीया यांच्या मार्गदर्शनाखाली निनाद ताम्हणकर,सागर शिंदे,अभिलाष बनसोडे हे सहभागी झाले आहेत.पुणे येथील रेस्कु टीमने आज सोमवारी सायंकाळी सात वाजलेपासून बिऊर येथील घटनास्थळी भेट देऊन त्या परिसराची माहिती घेतली.रात्री ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध सुरू आहे. 

चौकट-उद्या डॉग स्कॉड येण्याची शक्यता 

आज रात्री त्या बिबट्याचा शोध न लागल्यास त्याच्या शोधासाठी उद्या मंगळवारी (ता.३)रोजी पुणे येथून बिबट्याचा शोध घेणारे प्रशिक्षण देण्यात असलेले डॉग स्कॉड ही येणार आहे.

चौकट -अत्याधुनिक ड्रोनद्वारे शोध 

ज्याद्वारे बिबट्याचा शोध घेतला जात आहे.त्या एका  थर्मल ड्रोन कॅमेऱ्याची किंमत साडे बारा लाख आहे.असे सध्या ५ कॅमरे आहेत.त्या कॅमेऱ्यात रात्रीच्या थंड वातावरणात उष्ण रक्ताचा सजीव प्राणी फिरत असेल त्याच्या हालचाली दिसून येतात.याद्वारे बिऊर,उपवळे,तडवळे परिसर रात्रीचा पिंजून काढला जात आहे.मात्र त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.


Post a Comment

0 Comments