BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास व विराज उद्योग समूहात वृक्षारोपण


विश्वास व विराज उद्योग समूहात वृक्षारोपण

शिराळा : विश्वास व विराज उद्योग समूहाने सातत्याने पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन युवक नेते विराज नाईक यांनी केले.
      आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना व विराज इंडस्ट्रीजमध्ये वृक्षारोपण आले. त्यानिमित्ताने ते बोलत होते. कार्यकारी संचालक राम पाटील, सरव्यवस्थापक युवराज गायकवाड प्रमुख उपस्थितीत होते.
श्री. नाईक म्हणाले, विश्वास व विराज हे दोन्हीही उद्योग समूहात पर्यावरण पूरक यंत्रणा कार्यरत आहेत. कोणत्याही प्रकारे पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली जाते. विश्वासवर तर साखर कारखाना आहे का बागीचा आहे याची खात्री करावी लागते. यामागे लोकनेते कै. फत्तेसिंगराव नाईक व आमदार मानसिंगभाऊ यांची दूरदृष्टी लक्षात येते.
       प्रारंभी युवक नेते नाईक यांच्या हस्ते विश्वासवर व त्यानंतर विराज इंडस्ट्रीमध्ये वृक्षारोपण झाले. यावेळी सर्व खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments