BREKING NEWS ----- शिराळा येथे मोटरसायकल व चारचाकी अपघातात संतोष उत्तम ताईंगडे राहणार तळमावले ता.पाटण , जि. सातारा हा युवक ठार --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी


शिराळा, ता.९: अपघात होऊन  सात दिवस ओघळात अन्न पाण्याशिवाय  उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलणाऱ्या रुपेशची  मृत्युशी झुंज अखेर  मंगळवारी ११ व्या दिवशी अपयशी ठरली. त्याच्या जगण्यासाठी झटणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांनचा  क्षणार्धात चुराडा झाला.

   रुपेश विष्णू कदम( वय २६) अमेणी पैकी खोंगेवाडी  (ता.शाहूवाडी)  येथील तरुण.  तो ३० जानेवारी २०२१ रोजी  कोकरूड येथे आला होता. त्याने आपल्या मामा सोबत बाहेर हॉटेल मध्ये जेवण केले. रात्री घरी गेला नाही. तो दुसऱ्या दिवशी ही घरी न आल्याने व  त्याचा मोबाईल बंद असल्याने  नातेवाईकांनी मामाकडे चौकशी केली असता तो त्याच रात्री घरी आल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नसल्याने  त्याच्या वडिलांनी  तो कोकरूड येथून मोटरसायकर सह बेपत्ता असल्याची फिर्याद १ फेब्रुवारीला कोकरूड पोलीस ठाण्यात दिली होती. शनिवारी  ६ फेब्रुवारी रोजी सकाळी तुरुकवाडी (ता.शाहूवाडी) येथील सुभाष पाटील व विलास पाटील. हे कालव्याचे पाणी शेतीला पाजण्यासाठी गेले होते.पण शेतात  पाणी येत नसल्याने पाण्याच्या मार्गात कुठे अडथळा निर्माण झाला आहे का हे पाहण्यासाठी फिरत होते. ते पाहत असताना त्यांना शाहीरवाडी येथील सनंदरा शेता जवळ कोकरूड-ते तुरुकवाडी दरम्यानच्या  मुख्य रस्त्या लागत  असणाऱ्या दहा फूट ओघळात विव्हळत व अर्धवट बेशुद्ध अवस्थेत तरुण आढळून आला. त्यांच्या अंगा खालून पाणी जात होते. पाण्याचा प्रवाह कमी असल्याने तो वाचला होता. सोबत मोटरसायकल होती. दरम्यान  तरुण बेपत्ता असल्याची माहिती समाज माध्यमाद्वारे सर्वत्र फ़िरत होती.त्यावरून तो रुपेश असल्याची खात्री पटली. त्यानंतर डॉ.नामदेव पाटील, युवराज पाटील,एकनाथ पाटील  व ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेतुन त्यास भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते. त्या त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू असताना आज सकाळी त्याची प्राण ज्योत मालवली. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ,भावजय,पुतण्या,दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले





Post a Comment

0 Comments