BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

घराच्या ओसरीत बिबट्याचा प्रवेश झाला अन्


 शिराळा:  मांगरुळ  (ता. शिराळा ) येथील धनगर समाज परिसराच्या हद्दलगत  तानाजी शिंदे यांचे राहते घर आहे. बुधवारी (ता.१४)  त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या ओसरीत 'गावरान कोंबडी' पालनासाठी लाकडापासून तयार केलेल्या कोंबड्यांच्या कपाटावर रात्री अकरा वाजजा जोरजोराने काहीतरी आपटत असल्याचा आवाज येत होता. या वारंवार होणाऱ्या आवाजाने  शिंदे,त्यांच्या पत्नी संगिता, मुलगा प्रथमेश, मुलगी प्रिती अचानकपणे जागे झाले. त्यांनी ओसरीतील विद्युत बल्ब लावला.त्यावेळी  चक्क 'बिबट्या' कोंबड्यांच्या लाकडी कपाटात मोठ्याने पंजा मारत होता. हे दृश्य पाहून सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाला. मात्र लाईटचा प्रकाश पडताच त्याने  गुरगुरत  धूम ठोकली. आणि सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला.

    

Post a Comment

0 Comments