BREKING NEWS -----स्कार्पीओ दरीत कोसळून पाच जखमी -----शित्तूर -आरळा पूल पाण्याखाली --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बलात्कार करून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून। Rape and murder of a married woman by strangulation

  



इस्लामपूर: बलात्कार करून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी ( ता . १४ ) रात्री अकरानंतर घडली . वाळवा तालुक्यातील वाघवाडी परिसरात अनैतिक संबंधातून प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे . पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे .



  पोलिसांनी दिलेली माहिती अशी संबंधित महिला व पती यांच्यात वारंवार वाद होत होते . इस्लामपूर पोलिस ठाण्यात यापूर्वी त्यांनी परस्पर विरोधात तक्रारी दाखल केल्याआहेत . संबंधित महिलेचा इस्लामपूर शिवपुरी रस्त्यावरील मंगळवारी रात्री अकरानंतर खून करण्यात आला . आज दुपारी तीनच्या सुमारास प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला . पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली . तेथे इस्लामपूर रस्त्यापासून शंभर मीटर अंतरावर आतील बाजूस महिलेचा मृतदेह आढळला . खून झालेल्या ठिकाणी दारूची बाटली , सिगारेट तिच्यासोबतची पिशवी आढळली पिशवीत आंबे , कपडे , मेकअपचे साहित्य पोलिसांना आढळले . खून अतिशय निर्घृणपणे करण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे . ओढणीने गळा आवळल्यामुळे महिलेची मान मोडली आहे . तिचे तोंड मातीत दबलेल्या अवस्थेत दिसून आले खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे . उपविभागीय पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली . पुढील तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या . घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता . रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती . श्री . पिंगळे म्हणाले , " निर्घृणपणे खून करण्यात आला आहे . हा प्रकार अनैतिक संबंधातून घडला असावा , असा अंदाज आहे . मारेकऱ्याने घटनास्थळी मद्यपान केल्याचेही दिसते . बारा तासांपूर्वी बलात्कार करून खून झाल्याचा अंदाज आहे . मंगळवारी रात्री अकरानंतर हा प्रकार घडला असावा . महिला आणि पती यांच्यात वारंवार वाद होत होते . अन्य गोष्टी पोलिस तपासात निष्पन्न होतील पोलिस लवकरच छडा लावतील . "

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================



Post a Comment

0 Comments