शिराळा ,ता.५ : शिराळा येथील नागपंचमीच्या झालेला १९ टन कचरा नगरपंचायतने उचलला असून यात तुटलेल्या चप्पल व प्लास्टिक ३ टन,ओला कचरा १० तर सुका कचरा ६ टन याचा समावेश आहे. २५ कर्मचाऱ्यांनी ५ दिवसात हा कचरा गोळा करून शहर चकाचक केले आहे.
२३ वर्षा नंतर प्रथमच शिराळा येथे भाविकांना शैक्षणिक प्रबोधनाच्या माध्यमातून दर्शन झाले.यावेळी आगामी नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध पक्ष व इच्छुक उमेदवारांनी उभारलेल्या स्वागत कमानी व एकमेकांच्या इर्षे पोटी लावलेल्या फलका मुळे शहराचा चेहरामोहरा बदललेला होता. मात्र नागपंचमी दिवशी अनेक छोट्या छोट्या भजी,वडापाव ,स्वीट कॉर्न, चायनिज विक्रेत्यांची अपेक्षित विक्री झाली नाही.त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी न खपलेला नाशवंत माल रस्त्यावर फेकून दिल्याने व गर्दी मुळे तुलेल्या चप्पलांचा अनेक ठिकाणी ठीग पडलेला होता.त्यामुळे ५ दिवसात नगरपंचायतने १९ टन कचरा उचलला असून तुटलेल्या चप्पल व प्लास्टिक ३ टन,ओला कचरा १० तर सुका कचरा ६ टन असा २५ कर्मचाऱ्यांनी ५ दिवसात १९ टन कचरा गोळा करून शहर चकाचक केले आहे. नाल्यात मोठ्या प्रमाणात चप्पल व प्लस्टिक पडले होते.ठीक ठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानी काढल्याने सुरक्षित वाहतुकीसाठी प्रमुख रस्ते खुले झाले आहेत.
0 Comments