BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

क्यू आर कोड स्कॅन करून करा थेट तहसीलदारांशी संपर्क

 


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा,ता.५ :शिराळा तहसीलदार कार्यलया मार्फत  नागरिकांना घर बसल्या आपल्या समस्या  तत्काळ तहसीलदार यांच्याकडे  क्यू आर  कोडच्या माध्यमातून पोहचवण्याची  सुविधा उपलब्ध केली  आहे.त्या माध्यमातून  ग्रामीण भागातील लोकांना आता तहसीलदार कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.त्यामुळे लोकांच्या वेळेत आणि खर्चात बचत होणार आहे. आपल्या समस्या थेट तहसीलदार यांच्याकडे पोहचवण्यास  मदत होणार आहे. तहसीलदार कार्यालयाने क्यू,आर,कोड च्या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडवण्याची महराष्ट्रात पहिली अभिवन कल्पना राबवून आगळ्या वेगळ्या पद्धतीने महसूल दिन साजरा केला आहे. या क्यू.आर कोडच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यास सुरुवात केली आहे.

शिराळा हे तालुक्याचे ठिकाण आहे.येथे खुंदलापूर हे तालुक्याचे सुमारे ६० किलोमीटर अंतरावर शेवटचे गाव आहे. या गावाला सकाळ व सायंकाळ अशी दोन वेळ एसटीची सोय आहे.इतरवेळी खासगी वाहन,मोटरसायकल,अथवा पायी प्रवास करावा लागतो. अनेक वाड्या वस्त्या ह्या डोंगर कपारीत असल्याने त्या ठिकाणी एसटीची सोय नाही.त्यांना ही खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही.एसटीचा प्रवास करण्यासाठी पठार ,डोंगर कपारीतील व वाड्यावस्त्यावरील लोकांना मणदूर,आरळा,चरण,शेडगेवाडी मेणी फाटा येथे यावे लागते. खुंदलापूर पासून शिराळा येथे येण्यासाठी कमीत कमी एका माणसाला अडीचशे रुपये खर्च येतो.चहा ,नाष्टा,याचा खर्च हा वेगळा होत असतो.म्हणजे एका कामासाठी त्यांना काम झाले अथवा नाही तरी कमीतकमी तीनशे रुपये मोजावे लागतात.रोजगार बुडालेला असतो. काम न झाल्यास तीनेशे प्रवासाचे व कमीत कमी ३०० रुपये रोजंदारी बुडाल्याचे असा  सहाशे रुपये आर्थिक फटका सहन करावा लागतो.पुन्हा न झालेल्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागता. यावर उपाय म्हणून शिराळा तहसीलदार कार्यालयाने महसूल दिनाच्या निमित्ताने क्यू.आर,कोड च्या माध्यमातून समस्या सोडविण्याचा घेतले उपक्रम हा ग्रामीण लोकांच्या फायदाच्या आहे.त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.   हा क्यू आर  कोड स्कॅन करून  शिराळा तहसीलदारांशी थेट संपर्क साधा" याचा लोकार्पण सोहळा आमदार  सत्यजित  देशमुख यांच्या हस्ते करण्यात आल आहे.हे क्यू.आर.कोड प्रत्येक गावच्या चावडीवर लावण्यात आले आहेत.याद्वारे शिराळा तालुक्यातील नागरिक स्वतःच्या गावातून त्यांच्या समस्या थेट तहसीलदारांच्या पर्यंत पोहवता येणार आहेत.. त्यासाठी तहसीलदारांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना शिराळा येथे प्रत्यक्ष तहसीलदार कार्यालयात जाण्याची गरज नाही. या शिवाय  शिराळा तालुक्यातील मोडी लिपीमध्ये असणाऱ्या कुणबी नोंदीचे रजिस्टरचे मराठी भाषांतर करून गावनिहाय पद्धतीने संकलित करण्यात आले. सदरच्या रजिस्टरमुळे आता नागरिकांना कुणबी दाखल्या साठी अर्ज करताना मोडी वाचकाच्या वेगळ्या प्रतिज्ञापत्राची आवश्यकता भासणार नाही.सदरच्या रजिस्टर ची नक्कल तहसील कार्यालयातून प्राप्त होणार आहे. तालुक्यातील देवस्थान इनाम, खाजगी इनाम व वतन जमिनींची इंग्रजकालीन नोंदी असणारे "Land Alienation Register" याचे स्कॅनिंग करून यांचा ही  लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. त्यामुळे जुन्या काळातील जमिनींची माहिती आता सहज उपलब्ध होणार आहे.

तालुक्यातील दूरच्या  लोकांना महसूल विभागाकडे असणऱ्या अडचणी सोडवण्यासाठी वारंवार शिराळा येथे कार्यालया न येता घर बसल्या त्यांच्या पटकन सुटणाऱ्या अडचणींची दूर करण्यासाठी  निवासी  नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्या संकल्पनेतून क्यू.आर. कोडची निर्मिती केली आहे.त्याचा उपयोग हा नागरिकांना होणार आहे.घर बसल्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

शामला खोत-पाटील (तहसीलदार)

 

तहसीलदार शामला खोत-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून आमच्याकडे आलेल्या अर्जावर २४ तासात संबंधित विभागा मार्फत योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. त्याची माहिती त्या अर्जदार यांना व्हाट्सअप अथवा ईमेलवर पाठवली जाणार आहे.

अस्लम जमादार (निवासी नायब तहसीलदार)


हा क्यू.आर कोड तालुक्यातील प्रत्येक तलाठी कार्यालयात लावण्यात आला आहे. ज्यांच्याकडे मोबाईल सुविधा उपलब्ध नाही त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईल वरून आपला मोबाईल नंबर देऊन अर्ज भरला तरी चालेल.

राजेंद्र पाटील (महसूल नायब तहसीलदार) 



 


Post a Comment

0 Comments