शिराळा,ता.९ :गेले २३ वर्षाने प्रथमच दोन दशकानंतर शिराळरांच्यासह भाविकांना जगप्रसिद्ध असणऱ्या नागपंचमीच्या दिवशी शैक्षणिक प्रबोधनाच्या माध्यमातून जीवंत नागाचे दर्शन झाले.यासाठी सर्वांच्या सहकार्याने आमदार सत्यजित देशमुख यांनी पुढाकर घेवून शिराळकरांची अस्मिता जोपासली. याच बरोबर विविध विकास कामांना गती दिली. अनेक विकासात्मक कामे हाती घेतल्याने शिराळकरांच्या सह शिराळा विधासभा मतदार संघातील नागरिकांच्यावतीने आमदार सत्यजित देशमुख यांचा उद्या रविवारी (ता.१०) रोजी सायंकाळी चार वाजता पोटे चौक येथे गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार आयोजित केला आहे. या सत्कारची तयारी पूर्ण झाली आहे.
उद्या शिराळा येथे दुपारी २ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी आमराई चौक,कापरी नाका,लोहार गल्ली,नगर पंचयात,दिवटे चौक,फेडरेशन चौक,होळीचे टेक,चव्हाटा कोपरा,डांगे गल्ली कोपरा,गायकवाड वाडा,तळीचा कोपरा,छ. शिवाजी चौक, निकम गल्ली,मरिमी चौक,छ .शिवाजी महाराज पुतळा, अंबामाता मंदिर,नवजीवन वसाहत,शनी मंदिर,गिरनार बेकरी,लक्ष्मी चौक, या ठिकाणी विविध नाग मंडळाच्या माध्यमातून सत्कार करण्यात येणार आहे. याचं ठिकाणी महिला राखी बांधून औक्षण करणार आहेत. त्यानंतर पोटे चौक येथे जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील माने,आमदार विनय कोरे, आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष शिवाजीराव नाईक,भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह महायीतीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
0 Comments