BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

3 R संकल्पनेतून साकारली शववाहिका

 

शिराळा, ता.७:भंगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या  जुन्या  घंटागाडीला 3R च्या माध्यमातून (Reduce, Recycle, Reuse)  पर्यावरण पूरक संकल्पनेचा वापर करून शिराळा नगरपंचायतने बनवलेल्या शववाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 

गतवर्षा पासूनच संपूर्ण जगाला कोरोनाने जेरीस आणले आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या, वाढलेला मृत्युदर यातूनच प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण व उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारची जबाबदारी हे मोठे दिव्य होते. शववाहिके अभावी  वेळेत अंत्यसंस्कार करण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन शहरात कचरा संकलनासाठी फिरणाऱ्या स्वच्छता दूतां पैकी एक सेवानिवृत्त दूत! म्हणजेच घंटागाडी जवळ जवळ निर्लेखनाच्या (भंगाराच्या) प्रतिक्षेतच होती..पण तिचे निर्लेखन न करता 3R (Reduce, Recycle, Reuse)  या पर्यावरण पूरक संकल्पनेचा वापर करण्याची अभिनव कल्पना शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांना सुचली.त्यातून त्या घंटागाडीचे रूपांतर शववाहिकेत करून तिचा लोकार्पण सोहळा पार पडला.



यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी,मुख्याधिकारी योगेश पाटील,, माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, बांधकाम सभापती सौ. प्रतिभा पवार, पाणीपुरवठा सभापती मोहन जिरंगे, नगरसेवक संजय हिरवडेकर, उत्तम (बंडा) डांगे, सौ. सीमा कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे, अविनाश जाधव, शरद पाटील, सुविधा पाटील, सुभाष इंगवले, मुनीर लंगरदार, प्रकाश शिंदे, संजय इंगवले, प्रीती पाटील, काजल शिंदे, आबाजी दिवाण सदानंद टिळे  उपस्थित होते.

नागरिकांची अडचण आणि गरज ओळखून नगरपंचायतकडून जुन्या घंटागाडी पासून शववाहिका बनवून अत्यल्प भाडे आकारून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय थांबण्यास  ही शववाहिका उपयोगी ठरेल. नगराध्यक्षा सौ. सुनीता निकम 

  कोरोना प्रादुर्भाव काळामध्ये अंत्यसंस्कार साठी शववाहिका उपलब्ध होण्यास होणारा विलंब त्यामुळे मृतदेहाची होणारी हेळसांड पाहता आम्ही जुन्या व वापराविना  घंटागाडी पासून कमी खर्चात ही शववाहिका बनवली असून वेळप्रसंगी  रुग्णवाहिका व इतर वाहन म्हणून तिचा उपयोग शिराळा शहरातील व परिसरातील नागरिकांना होईल मुख्याधिकारी योगेश पाटील.

Post a Comment

0 Comments