वारणावती ,ता.२८ : खुंदलापूर ता शिराळा येथील चांदोली अभयारण्य लगत असणाऱ्या खातवाड या स्वतःच्या मालकी रानात मंगळवारी सकाळी ९.३० वाजता गव्याने ठकुजी गंगाराम शेळके (वय६५) या शेतकर्यावर गंभीर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली.घटनास्थळा वरून खाजगी वाहनाने जखमीस मणदुर येथे आणले.लोकांनी आरडाओरडा केल्याने गवा जंगलात पळुन गेला .जखमीवर मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. खुंदलापूरच्या पोलिस पाटील धाकलु गावडे यांनी वन विभागाशी संपर्क साधुन पुढील उपचारासाठी वन विभागाच्या वाहनातून कराड येथील खाजगी कृष्णा रुग्णालयात हलवले.
0 Comments