BREKING NEWS ----- --शिराळ्यात अंबरनाथची बैलजोडी ठरली सम्राट केसरीची मानकरी --------------------------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोटरसायकल अपघातात पाडळीवाडी एक ठार | Padliwadi one killed in motorcycle accident

मोटरसायकल अपघातात पाडळीवाडी एक ठार | Padliwadi one killed in motorcycle accidentमोटरसायकल अपघातात पाडळीवाडी एक ठार | Padliwadi one killed in motorcycle accident शिराळा: १७ एप्रिल २०२३ : येथील   शिराळा ते पाडळी  या मुख्य रस्त्यावर शिंप्याची विहीर येथे दोन  मोटारसायकलींच्या समोरासमोर  झालेल्या धडकेत पोपट गणपती पाटील (वय५०, रा. पाडळीवाडी) हे  ठार तर तानाजी पांडुरंग सुतार (वय ६४ रा. काळगाव ता.पाटण)  हे गंभीर जखमी झाले आहेत .ही घटना आज सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. 

मोटरसायकल अपघातात पाडळीवाडी एक ठार | Padliwadi one killed in motorcycle accident

     या बाबत घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की,तानाजी पांडुरंग सुतार हे सोमवारी मुंबई वरून काळगाव या आपल्या  गावी  आलेले होते. ते आपला मुलगा महेंद्र च्या सोबत हिरो होंडा मोटारसायकल  वरून काळगाव वरून जोतिबा दर्शनासाठी निघालेले होते.  पोपट पाटील हे ही  मोटारसायकल वरून  शिराळा येथील सोमवारच्या आठवडा बाजारात बाजार करून पाडळीवाडी येथील घराकडे निघालेले होते. दरम्यान  शिराळा ते पाडळी  या मुख्य रस्त्यावर शिंप्याची विहीर येथे  समोरून आलेल्या महेंद्र सुतार यांच्या व त्यांच्या गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात  पोपट पाटील  हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात आणले असताना त्यांचा मृत्यू झाला. पोपट यांच्या पश्चातआई, पत्नी,मुलगा असा परिवार आहे. जखमी तानाजी सुतार यांना उपचारासाठी  कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये मध्ये  दाखल करण्यात आले आहे.प्राथमिक तपास सह्यायक पोलीस फौजदार शिवाजी पाटील हे करीत आहेत.

मोटरसायकल अपघातात पाडळीवाडी एक ठार | Padliwadi one killed in motorcycle accidentPost a Comment

0 Comments