BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बैलगाडी शर्यत बंदी उठवण्यासाठी पाठपुरावा करणार-माजी मंत्री शिवाजीराव नाईक

 


शिराळा:शिराळा - वाळवा तालुक्यातील बैलगाडी शर्यतीवर असणारी बंदी उठवण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना निवेदन देताना अशोकराव पाटील, सर्जेराव पाटील,विलास निकम, एकनाथ पाटील

 शिराळा,ता.११: बैलगाडी शर्यत हा ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा पारंपरिक आवडीचा खेळ आहे. यामध्ये शेतकऱ्याकडून बैलाला कोणतीही हानी होत नाही. कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या बैलगाडी शर्यतीचा प्रश्न सोडवून बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी , मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सांगितले.     

 शिराळा - वाळवा तालुक्यातील बैलगाडी शर्यतीवर प्रेम करणाऱ्या प्रेमींनी बंदी उठवण्यासाठी माजी मंत्री नाईक यांना निवेदन दिले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपसभापती अशोकराव पाटील (दाजी) यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी नाईक म्हणाले, बैलगाडी शर्यती हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा अस्मितेचा प्रश्न आहे. यामध्ये कुणी व्यवसायिक, उद्योजक व धंदेवाली सहभागी होत नाहीत. या बैलगाडी शर्यतीचे व ग्रामीण भागाचे एक वेगळे नाते आहे. शर्यतीवर न्यायालयात याचिका दाखल केल्याने बैलगाडी शर्यती थांबलेल्या आहेत.बैलगाडी शर्यती ही मनोरंजनाची गोष्ट आहे. हजारो लोक बैलगाडी शर्यतीचे शौकीन असून हे एक ग्रामीण भागातील आकर्षण आहे . बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवून पुन्हा गतवैभव निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार.

यावेळी विलास निकम, नथुराम दळवी, एकनाथ पाटील, पोपट गायकवाड, सर्जेराव पाटील, संजय पाटील, राजू चव्हाण, दीपक कदम, युवराज पाटील उपस्थित होते.     

Post a Comment

0 Comments