BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आम्हाला ही कलाकार मानधन द्या-वारकरी साहित्य परिषदेची मागणी

 


शिराळा, ता.:  वारकरी साहित्य परिषद शिराळच्यावतीने कोरोनामुळे दोन वर्षे कार्यक्रम बंद असल्याने कीर्तनकार,प्रवचनकार व त्यावर आधारित असणाऱ्या इतर कलाकारांच्यावर उपासमारिची वेळ आली आहे.त्यामुळे आम्हा सर्व कलाकारांना मानधन द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे, कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे परमार्थ थांबल्याने किर्तनकार , प्रवचनकार , गायन , मृदंगमनी , हार्मोनियम , टाळकरी , भजन हरीपाठ या माध्यमातून होणाऱ्या समाज प्रबोधनाचे साप्तहिक कार्यक्रम बंद असल्यामुळे कलावंतावर उपासमारीची वेळ आलेली आहे . त्यांच्या नावाची नोंद नसल्याने त्यांची नोंद घेवून आर्थिक मदत मिळावी . वारकरी साहित्य परिषदेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडे कलावंताची यादी सादर केली आहे. कोव्हीड १ ९ मुळे  ते काम थांबले आहे. तरी त्या कामाला गती मिळावी.

यावेळी बाळासो भोसले,प्रकाश कदम, बाबासो  पाटील. नानासो अथकिरे. प्रविण साळुखे. सदाशिव पाटील, शंकर शेवडे, तानाजी शेंडगे, दत्तात्रय पाटील, स्वप्नील  सावंत, सर्जेराव  लोहार  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments