पाडळेवाडी ता. शिराळा येथील पाडळेवाडी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संपत पांडुरंग पाटील तर उपाध्यक्षपदी बाबासो शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक डी.एस. खताळ उपस्थित होते.
यावेळी नूतन सदस्य बाळासो ज्ञानू पाटील, शिवाजी बाबुराव पाटील, सुभाष राजाराम पाटील, नामदेव हरी चव्हाण, संदीप बाळकृष्ण पाटील, विनोद धोंडीराम पाटील, बाबासो शामराव पाटील, विजय रघुनाथ लोकरे, सर्जेराव खंडू चव्हाण, सिंधुताई रायसिंग पाटील, मंगल तानाजी चव्हाण यांच्यासह नारायण चव्हाण, अधिक चव्हाण ,हिम्मत पाटील उपस्थित होते. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांनी चिखली येथे विश्वास कारखाना कार्यस्थाळावर जाऊन लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

0 Comments