BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश |NCP workers join BJP


 

शिराळा,ता.२२:गुढे ता.शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.त्यांचे स्वागत हातकणंगले लोकसभा मतदार संघ भाजप प्रमुख, जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख व शिराळा विधानसभा भाजपा प्रमुख सम्राट महाडीक यांनी केले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील,सोनियाजी उद्योग समूहचे अध्यक्ष बाजीराव शेंडगे, शिराळाचे माजी नगरसेवक केदार नलवडे, गुढे माजी सरपंच सखाराम दुर्गे, गणपत पाटील, विजय कुंभवडे,सुनिल गुरव, सरगम मुल्ला प्रमुख उपस्थित होते.

यावेळी देशमुख म्हणाले, गुढे, पाचगणी पठारावरती मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न स्व.शिवाजीराव देशमुख यांनी केला. बारमाही रस्ते, वीज दिली. येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. या गावातील सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करू.पक्ष वाढीसाठी काम करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्व मोठे करण्यासाठी काम करा.

सम्राट महाडीक म्हणाले :- स्व. शिवाजीराव देशमुख यांनी या भागाचा मोठा विकास केला आहे. काही मंडळी खोटे नाटे बोलून लोकांना भूलविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल.

यावेळी हणमंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.गुढे येथील विठ्ठल पाटील, चंद्रकांत कांबळे,माजी सरपंच विष्णू पाटील, संभाजी सनुगले, गणपती पाटील, अधिक पाटील, दगडू काटकर, वसंत पाटील, अरुण पाटील, शिवाजी संनुगले, विष्णू नाना पाटील, आप्पा पाटील, शंकर  पाटील, धोंडीराम पाटील, संतोष पाटील, विठ्ठल रामचंद्र पाटील, मारुती काटकर, विष्णू लक्ष्मण पाटील, विष्णू काटकर, नामदेव पाटील, नारायण पाटील, तुकाराम पाटील, विलास काटकर, दिलीप पाटील, अविनाश कांबळे, शिवाजी आप्पा पाटील,गणेश काटकर,रमेश पाटील,नामदेव पाटील,प्रकाश पाटील,दगडू काटकर,पांडुरंग दत्तू पाटील,विठ्ठल गुरव,संतोष पाटील, उमेश कचणकर,गणेश पाटील,जगदीश पाटील,रामचंद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,आजी माजी सेवा सोसायटी सदस्य, पदाधिकारी यांनी जाहीर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

  

Post a Comment

0 Comments