BREKING NEWS ----- शिराळा येथे मोटरसायकल व चारचाकी अपघातात संतोष उत्तम ताईंगडे राहणार तळमावले ता.पाटण , जि. सातारा हा युवक ठार --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जनउत्कर्ष पतसंस्थेच्यावतीने सभासदांना ९ टक्के लाभांश वाटपDistribution of 9 percent dividend to members on behalf of Jan Utkarsh Credit Union

वाकुर्डे खुर्द ता.शिराळा येथे जनउत्कर्ष पतसंस्थेच्यावतीने सभासदांना ९ टक्के लाभांश वाटप प्रसंगी संस्थेचे संस्थापक विजयसिंग खांडेकर सोबत अध्यक्ष शांताराम जाधव ,संचालक शिवाजीराव चौगुले , सुखदेव गुरव 

 

शिराळा,ता.१८: संस्थेने नेहमीच सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. पारदर्शक व्यवहार व काटेकोर नियोजन हे संस्थेचे धोरण आहे. त्यामुळेच  सभासदांना सातत्याने अखंडीत ९ टक्के लाभांश वाटप करण्याची परंपरा कोरोना काळ अडचणीचा असताना ही त्यावरती मात करत  कायम ठेवली असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक विजयसिंग खांडेकर यांनी केले.    

वाकुर्डे खुर्द ता.शिराळा येथे जनउत्कर्ष पतसंस्थेच्यावतीने सभासदांना ९ टक्के लाभांश वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शांताराम जाधव होते.  यावेळी खांडेकर म्हणाले, संस्थेचे सभासद १६५१ असून एकूण लाभांश वाटप ७,६१,९१७ रुपये करण्यात येत आहे.स्थापणे पासून आता पर्यंत सभासदांना १०० रुपयाच्या शेअर्स वर १३१ टक्के परतावा मिळाला आहे.

 स्वागत शाखा प्रमुख हर्षद कदम यांनी तर   प्रास्ताविक संचालक के.वाय.भाष्टे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष विष्णू सावंत , श्रीकृष्ण हारुगडे ,रामचंद्र  गुरव,आनंदा जाधव,जनार्धन  कांबळे,शिवाजीराव चौगुले,रघुनाथ धुमाळ, अशोक काटकर, प्रदीप गायकवाड, तानाजी शिंदे, शोभा पाटील,सुनंदा मस्के यांच्या सह  सुखदेव गुरव,आनंदा पाटील ,संतोष पाटील,दुर्वास कुंभार ,लता कुंभार उपस्थित होत्या. आभार मुख्य व्यवस्थापिका अंजना खांडेकर यांनी मानले.


Post a Comment

0 Comments