BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खून प्रकरणी सोमवार पर्यंत पोलीस कोठडी |Police custody till Monday in case of murder

 


शिराळा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून  शिराळा तालुक्यातील मांगले  येथील धनटेक वसाहतीमध्ये  रामचंद्र कोंडीबा सुतार (वय ६०, मूळ गाव राशिवडे, ता. राधानगरी) या वृद्धाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली संदीप शामराव सुतार वय ३५ याने शिराळा पोलिसांना दिली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.  ही  घटना काल गुरुवारी सायंकाळी सात ते साडे सात वाजण्याच्या सुमारास  घडली होती. याबबत इंदुताई रामचंद्र सुतार यांनी वर्दी दिली आहे.  

 मणदूर (ता. गगनबावडा) येथील संदीप शामराव सुतार हा  रामचंद्र यांच्या मेहुणीचा मुलगा आहे. रामचंद्र हे पत्नीसह तीस वर्षापासून मांगले येथील धनटेक वसाहतीमध्ये राहत होते. गुरुवारी दुपारी संदीप  हा रामचंद्र यांच्या घरी आला. त्यावेळी रामचंद्र यांच्या  पत्नी इंदुबाई या कामासाठी बाहेर गेल्या होत्या. रात्री त्या काम संपवून घरी आल्या. त्यावेळी पती रामचंद्र दारातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.. त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर शेजारचे लोक जमा झाले. रामचंद्र यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला मोठा दगड पडला होता. मृतदेहा शेजारी संशयित संदीपची डायरी व यांच्या आईचे मतदान ओळखपत्र पडले होते. रात्री उशीरा शिराळा पोलिस ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर पोलिस दाखल झाले होते.रात्री उशीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करत आहेत.


Post a Comment

0 Comments