BREKING NEWS ----- --शिराळ्यात अंबरनाथची बैलजोडी ठरली सम्राट केसरीची मानकरी --------------------------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून | Younger brother killed elder brother


 

शिराळा,ता.१२ :  कापरी ता. शिराळा येथे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून सख्या लहान भावाने मोठ्या भावाचा डोक्यात लाकडी  दांडके घालून  खून केल्याची घटना घडली. महेश राजेंद्र मोरे (वय २७) असे मृताचे नाव आहे. 

ही घटना शनिवारी मध्यरात्री रात्री १ वाजण्यापूर्वी घडली.याबाबत पोलीस पाटील बजरंग कुंभार यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे( वय २२) हा खून करून  पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

याबबत शिराळा पोलिसांनी व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मयत महेश  व संशयित आरोपी अविनाश हे सख्खे भाऊ आहेत. ते दोघे ही  सेंट्रिंगवर  काम करतात. त्यांचे  मुळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील  हालंडी असून ते  आई सोबत लहानपनापासून आजोळी राहतात. महेश हा विवाहित होता . तो  त्याच्या कामाचे पैसे घरी देत नसल्याने त्या दोघां भावामध्ये  सतत  वादावादी होत होती. 

शनिवारी महेश, त्याची आई व  भाऊ अविनाश यांच्यात घरी पैशाच्या कारणावरून भांडणे चालली होती. त्यावेळी महेश व अविनाश हे दोघे घराच्या बाहेर काही अंतरावर भांडत  वसाहतवाडी येथे कापरी जाणाऱ्या रस्त्यावर संपत जाधव यांच्या घरासमोर आले. त्यावेळी अविनाश याने महेशच्या डोक्यात लाकडी दांडके मारून त्यास गंभीर जखमी केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला.

याबाबत पोलीस पाटील बजरंग कुंभार यांनी माहिती पोलीस ठाण्यास  दिली.त्यावेळी तातडीने पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत घटनास्थळी भेट दिली. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून  मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.त्याच्यावर कापरी येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील करत आहे. 

 मुले असून आईबाप निराधार 

राजेंद्र मोरे यांना महेश व  अविनाश ही दोन मुले. त्या मोरे दाम्पत्याची दोन मुले वृद्धापकाळाचे आधार होते. पण दुर्दैवाने त्यांच्या नशिबी वृद्धापकाळी सुख नशिबी नव्हते. लहान मुलेने मोठ्या मुलाचा खून केल्याने वृद्धापकाळाचा आधार असणारा एक मुलगा काळाच्या पडद्याआड गेला तर दुसऱ्याला खुनाची शिक्षा भोगावी लागणार. त्यामुळे दोन मुळे असताना ही त्या दाम्पत्यावर निराधार होण्याची वेळ आली.

 

Post a Comment

0 Comments