शिराळा,ता.७ जुलै: चांदोली परिसरात पावसाचा जोर वाढल्याने वारणा धरणाच्या सांडव्यातून २८७० तर विद्युत निर्मितीमधून १६३० असा एकूण ४५०० कुसेक विसर्ग वारणा नदीत सुरु आहे.त्यामुळे वारणानदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी बॅरिकेट लावले आहेत. त्यामुळे काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.वारणा काठची पिके पाण्याखाली जाऊन लागली आहेत.
काल सोमवरी चांदोली परिसरात २४ तासात ५७ तर ८ तासात ४४ मी.मी.असा आज अखेर एकूण १४६५ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.धरणात २८. २३ टी.एम.सी पाणीसाठा आहे. ६२०.४० मीटर पाणी पातळी तर पाणीसाठा ७९९ .४०८ द.ल.घ.मी झाला आहे.धरणात ६७३७ कुसेक पाण्याची आवक सुरु असल्याने सांडव्यातून २८७० तर विद्युत निर्मितीमधून १६३० असा एकूण ४५०० कुसेक विसर्ग वारणा नदीत सुरु आहे.त्यामुळे वारणा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे..पाणी पात्राबाहेर पडून पोट मळीत आल्याने अनेक ठिकाणी वारणा काठची पिके पाण्याखाली गेली आहेत.चरण येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे.
चौकट-मंडलनिहाय पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिली मीटर मध्ये असा...
कोकरूड ३१ (१७१.९)
शिराळा (५३.९)
शिरशी २१.५ (१०१.६)
मांगले -१०.८ (७६.६)
सागाव - १९.५ (११५.६)
चरण ५५ (२६९.४)
वारणावती ५७ (१४२१ )
0 Comments