BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

९ ते १० फुटी लांबीच्या व सुमारे८० ते ९० किलो वजनाच्या मगरीला पकडले

आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

 शिराळा,ता.८जुलै :धामवडे (ता.शिराळा) येथे धामवडे-शिरशी च्या हद्दीवर शिवेच्या टेकावरील मस्कर वस्ती जवळ धामवडे -शिरशी या मुख्य रस्त्यावर आलेल्या सुमारे ९ ते १० फुटी लांबीच्या व सुमारे८० ते  ९० किलो वजनाच्या  मगरीला  प्राणी मित्र,वनविभाग व ग्रामस्थांनी जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले.

या बाबत घटनास्थळ व वनविभागाकडून  समजलेली माहिती अशी, कोंडाईवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील,सुरेश पाटील, प्रथमेश पाटील,हे कामा निमित्ताने वाळवा तालुक्यातील सुरुल येथे गेले होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास परत घरी कोंडाईवाडी येथे निघाले असता धामवडे ते शिरशी हद्दीत शिवेच्या टेकावर मस्केवस्ती जवळ आले असता त्यांना रस्त्यावर लाकडाच्या ओंडक्या सारखे काहीतरी दिसले. त्यामुळे त्यांनी चारचाकी गाडीची गती कमी केली. त्यावेळी गाडीचा प्रकाश पडल्याने मगर उठून रस्त्यावरून चालू लागली. गाडीची गती कमी केली असता मगर सुमारे १०० मीटर रस्त्यावरून चाल होती.नंतर रस्त्या लागत असणऱ्या छोट्या पाणी साचलेल्या चरीत  बसून राहिली. तिला पकडणे गरजेचे होते.त्यामुळे  विलास पाटील, सुरेश पाटील, प्रथमेश पाटील हे चारचाकीत बसून तिच्यावर २० मिनिटे लक्ष ठेवून होते.याबाबत प्रथमेश पाटील  यांनी धामवडे येथील संतोष मादळे व वाळवा तालुक्यातील भाटवडे  येथील त्यांचे  प्राणी मित्र असणाऱ्या गणेश निकम व प्रशांत देवकर  यांना माहिती दिली.त्यांनी २० मिनिटात घटनास्थळी जाऊन तिला पकडून ठेवले

.याबाबत  वनपाल अनिल वाजे यांना माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी  वनरक्षक दत्तात्रय शिंदे, संतोष कदम, प्राणीमित्र प्रा.सुशीलकुमार गायकवाड आणि ग्रामस्थ  दाखल झाले. सर्वांनी  मगरीला सुरक्षितपणे जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले .या रेस्क्यू मोहिमेत प्राणी मित्र गणेश निकम, प्रशांत देवकर,प्रा. सुशीलकुमार गायकवाड, वनपाल अनिल वाजे,वनरक्षक दत्तात्रय शिंदे, संतोष कदम,विलास पाटील, सुरेश पाटील, प्रथमेश पाटील,संतोष मादळे,बाबासो मस्कर  यांचे योगदान मोलाचे ठरले. गावापासून काही अंतरावर मगर आली असल्याने आता लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

दोन दिवसापूर्वी मगर दिसली होती.

कोंडाईवाडी येथे दोन दिवसापूर्वी रात्री खेकडी पकडण्यासाठी गेलेल्या तरुणांना ही कोंडाईवाडीच्या जॅकवेल जवळ असणाऱ्या ओढ्यात  मोठी मगर दिसली होती. त्यामुळे धामवडे व  कोंडाईवाडी  परिसरात मगरीचा मुक्त संचार सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे.

मगर दोन मार्गे आल्याची शक्यता 

वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलावातून मगर भाऊ दऱ्या च्या ओढ्यातून अथवा करमजाई तलावातून शिरशी बोगद्यामार्गे आली असल्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. कारण करमजाई तलावात लोकांना मगरीचे दर्शन होत आहे.त्यामुळे या तलावातील मगरी असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आम्ही रात्री साडे अकराच्या सुमारास मस्केवस्ती जवळ आलो  असता रस्त्यावर लाकडाच्या ओंडक्या सारखे काहीतरी दिसले.त्यामुळे  चारचाकी गाडीची गती कमी केली. त्यावेळी गाडीचा प्रकाश पडल्याने मगर उठून रस्त्यावरून चालू लागली.त्यामुळे आम्ही प्राणी मित्र  असणऱ्या गणेश निकम व प्रशांत देवकर यांना माहिती दिली. त्यांनी येऊन मगरीला पकडून ठेवले .मगर पकडण्याचा थरार हा सुमारे साडे आकार ते दीड असा दोन तास सुरु होता.

प्रथमेश पाटील (युवक ) 

आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

Post a Comment

0 Comments